यवतमाळमधील देवांग मिश्रा अमृत संस्थेच्या योजनेतून झाले ड्रोन पायलट

आत्मविश्वास वाढून करिअरला दिशा मिळाल्याची भावना

यवतमाळमधील देवांग मिश्रा अमृत संस्थेच्या योजनेतून झाले ड्रोन पायलट मुख्य फोटो
मुख्य फोटो

यवतमाळ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. या योजनेचा लाभ यवतमाळ येथील देवांग मिश्रा यांनी घेतला. त्यांनी ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या तांत्रिक ज्ञानात वाढ झाली असून, कौशल्यविकासाच्या दृष्टीने त्यांना मोठा लाभ झाला आहे.

या प्रशिक्षणामुळे आपल्याला व्यावसायिक संधी तर उपलब्ध झाल्याच; शिवाय आत्मविश्वास वाढून आपल्या भविष्यातील करिअरसाठी स्पष्ट दिशा मिळाली, असे देवांग मिश्रा यांनी सांगितले. अमृत संस्थेतर्फे मिळालेल्या मार्गदर्शनामुळे हे प्रशिक्षण घेणे शक्य झाले, याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.

अमृत संस्थेच्या योजनांमधून युवकांना कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उद्देश साध्य होत असल्याचे त्यांच्या या अनुभवातून स्पष्ट होते. अशा योजनांमुळे अनेक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

परीक्षित कमलकिशोर शर्मा - ९११२२२७६३३

यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, 

फ्लॅट क्रमांक ए-वन, अवधूतवाडी, 

तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 29-01-2026 News publication date | Time: 11:43 AM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 29-01-2026 News publication date | Time: 11:43 AM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words