दर्जेदार प्रशिक्षण मोफत मिळाल्याबद्दल मानले आभार
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून अमरावतील येथील पीयूष कोळेश्वर यांनी ड्रोन पायलट कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. पाच ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ड्रोन वर्ल्ड सेंटरमध्ये हे प्रशिक्षण पार पडले.
मीडियम आरपीसी ड्रोन आणि ड्रोन इन ॲग्रीकल्चर या विषयांतील ड्रोन पायलट प्रशिक्षण कोर्स पीयूष यांनी केला आहे. कोर्समध्ये त्यांना ड्रोनविषयक सैद्धांतिक ज्ञान मिळाले. तसेच, सिम्युलेटरवर आणि प्रत्यक्ष मैदानावर ड्रोन उडवण्याचा अनुभवही घेता आला. शेवटी परीक्षा घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झाल्यावर त्यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उपयोग त्यांना अर्थार्जनासाठी होणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पीयूष कोळेश्वर यांनी अमृत संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयाला भेट दिली. या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर व जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी त्यांना अमृत संस्थेच्या इतर योजनांची माहिती दिली. अत्यंत महागडे आणि दर्जेदार असे हे प्रशिक्षण अमृत संस्थेमुळे मोफत घेता आले, त्याबद्दल पीयूष यांनी अमृत संस्थेचे आभार मानले. तसेच, युवकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांसह संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
केदार गोगरकर - ९११२२२७६३५
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment