'अमृत'च्या निःशुल्क प्रशिक्षणातून कौशल्यवृद्धी अन् अल्पावधीत लाखमोलाची कमाई

परभणीतील सूर्यमित्र सुनील देशपांडे यांची प्रेरक यशोगाथा

'अमृत'च्या निःशुल्क प्रशिक्षणातून कौशल्यवृद्धी अन् अल्पावधीत लाखमोलाची कमाई मुख्य फोटो
'अमृत'च्या निःशुल्क प्रशिक्षणातून कौशल्यवृद्धी अन् अल्पावधीत लाखमोलाची कमाई अतिरिक्त फोटो

परभणी : कोणतेही कौशल्य माणसाला अधिक सक्षम करते. राज्य शासनाची अमृत ही स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, त्यांना कौशल्यवृद्धीसाठी निःशुल्क प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यावर संस्थेचा भर आहे. परभणीतील सुनील खंडेराव देशपांडे हे त्यापैकीच एक. त्यांनी अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू केला आणि अल्पावधीत दीड लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यांनी आतापर्यंत ७०हून अधिक सोलार पॅनेल्सचे यशस्वीरीत्या इन्स्टॉलेशन केले आहे.

सुनील देशपांडे यांनी अमृत संस्थेतर्फे दिले जाणारे सूर्यमित्र हे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रशिक्षणासाठी त्यांना एकही रुपया खर्च करावा लागला नाही. आजचे युग सौरऊर्जेचे असून, घरोघरी सौरऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवण्याचे प्रमाण वाढले आहे. पीएम सूर्यघर योजनेमुळे त्यात अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तंत्रज्ञांची समाजाला गरज आहे. म्हणूनच अमृत संस्थेने अमृत सूर्यमित्र हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. संस्थेच्या लक्ष्यित गटातील समाजघटकांना हे प्रशिक्षण निःशुल्क दिले जाते. त्या प्रशिक्षणाचा लाभ सुनील देशपांडे यांनी घेतला.

प्रशिक्षणातून तांत्रिक ज्ञान आणि कामाचा अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आपल्या यशाचे श्रेय देशपांडे यांनी अमृत संस्था आणि संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापकांना दिले. ते म्हणाले, 'मला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा होता; पण तांत्रिक ज्ञान नव्हते. अमृत सूर्यमित्र प्रशिक्षणामुळे मला योग्य दिशा मिळाली. प्रशिक्षणासाठी एकही पैसा लागला नाही आणि आज मी सन्मानाने दीड लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकलो आहे. हे यश फक्त आणि फक्त अमृत संस्थेमुळेच शक्य झाले आहे.' 

देशपांडे यांचे हे यश सर्वांसाठीच प्रेरक ठरत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत,

पहिला मजला, बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला,

परभणी.

मोबाइल : 7391065473

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 10:14 AM News publication time | Views: 1,414 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 10:14 AM News publication time | Views: 1,414 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words