जालन्याच्या अंबड तालुक्यातील व्यावसायिकांची भावना
अंबड (जि. जालना) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, अमृत संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे. या योजनेचा लाभ जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सुरेश देशपांडे, अजय मालू, बालाप्रसाद मुंदडा, गोविंद लाहोटी आणि अतुल मालू यांना झाला आहे. अमृत संस्थेमुळे कर्जावरील व्याजाचा आर्थिक ताण कमी झाल्याने व्यवसायाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील युवकांनी, व्यावसायिकांनी व नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लक्ष्यित गटातील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असल्यास, त्या कर्जावरील १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे परत दिले जाते. लाभार्थ्यांनी कर्जाची फेड नियमित केल्यास दर तीन महिन्यांनी संबंधित कालावधीतील व्याजाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्यामुळे दोन वर्षांचा कालावधी प्रत्यक्षात व्याजमुक्त ठरतो व वाचलेली रक्कम व्यवसायवृद्धीसाठी उपयोगात येते.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
संपर्क :
नितीन खेकाळे - 7391065474 / 9130283058
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता :
अमृत जिल्हा कार्यालय,
दुसरा मजला, प्रशासकीय इमारत,
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment