भारताच्या समृद्ध वारशाचे मूर्तिमंत उदाहरण
अजिंठा लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून, हे जागतिक वारसास्थळ आहे. ख्रिस्तपूर्व दुसरे शतक ते इसवी सन सहाव्या-सातव्या शतकादरम्यान या लेण्यांचे काम झाले असून, त्या प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या वारशासाठी ओळखल्या जातात.
ही लेणी वाघूर नदीच्या परिसरात एका घोड्याच्या नालाच्या आकाराच्या घळीमध्ये कोरलेली आहेत. अजिंठा येथे एकूण ३० लेणी आहेत. त्यामध्ये प्रार्थनागृहे (चैत्य) आणि निवासस्थाने (विहार) यांचा समावेश आहे. ही लेणी त्यातील अद्वितीय भित्तिचित्रांसाठी जगप्रसिद्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भगवान बुद्धांचे जीवन आणि जातककथा चित्रित केलेल्या आहेत. युनेस्कोने १९८३मध्ये अजिंठा लेणी हे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. सातवाहन आणि वाकाटक राजवंशांच्या काळात या लेण्यांचे मोठे काम झाले. १८१९मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने शिकारीला गेलेला असताना या लेण्यांचा पुन्हा शोध लावला. छत्रपती संभाजीनगरपासून हे ठिकाण सुमारे १०५ ते ११० किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेल्वेस्थानक जळगाव (सुमारे ६० किलोमीटर) किंवा छत्रपती संभाजीनगर हे आहे. आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment