जळगावच्या पाळधी गावातील श्री साईबाबा मंदिर आणि श्री महागणपती मंदिर

वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक पर्यटनस्थळे

जळगावच्या पाळधी गावातील  श्री साईबाबा मंदिर आणि श्री महागणपती मंदिर मुख्य फोटो
जळगावच्या पाळधी गावातील  श्री साईबाबा मंदिर आणि श्री महागणपती मंदिर अतिरिक्त फोटो

जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी हे गाव गिरणा नदीकाठी आणि अगदी नेमके सांगायचे झाले, तर जळगाव तालुका व धरणगाव तालुक्याच्या मधोमध आणि नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्ग सहाच्या बाजूला वसलेले आहे. तेथे २४ डिसेंबर २००३ रोजी साईबाबांचे मंदिर स्थापन करण्यात आले आहे. सर्व समाजबांधव मोठ्या भक्तीने या मंदिरात पूजा, उपासना करत असतात. या मंदिराला महाराष्ट्र शासनाचा ब दर्जा मिळाला आहे. या ठिकाणी मोठी गोशाळा असून, शेतकऱ्यांनी सोडून दिलेल्या सुमारे १३०० भाकड गायी तेथे आहेत. मंदिराचा २३वा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या ब्रह्मोत्सवात दर वर्षी तीन दिवस जागतिक कीर्तीचे गायक आपली गायनसेवा श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करत असतात. राज्यभरातील भक्त या कालावधीत येथे येत असतात. तीन दिवस अखंड भंडाराही सुरू असतो.

या गावातच हायवेच्या दुसऱ्या बाजूला महागणपती मंदिर आहे. तेही पर्यटनाच्या दृष्टीने भविष्यात चांगले विकसित होईल असे वाटते. त्या ठिकाणी श्री सिद्धी महागणपतीची अर्थात सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या विनायकाची मूर्ती आहे. रिद्धी-सिद्धीसह बसलेली अशी संपूर्ण भारतातील मोठी मूर्ती असून, उजव्या सोंडेत अमृतकुंभ, पोटावर नाग आणि ललाट पातळीवर घंटा असलेला आहे. हे मंदिर पाच एकर भव्य परिसरात निसर्गरम्य ठिकाणी उभे केलेले आहे. ३७४ टनाच्या एकाच शिळेमध्ये बनवलेली १०० टन वजनाची बाप्पाची मूर्ती असून, ३१ फूट उंच अशी भारतातील एकमेव मूर्ती आहे. पंधरा फूट उंच रिद्धी-सिद्धीसह सहा फूट उंच मूषकराज विराजमान आहेत. १२५ फूट उंच शिखरावर नऊ फूट उंचीचा कळस आहे.
तीनशे किलोग्रॅम वजनाची विशाल घंटा या मंदिरात आहे. वीस हजार स्क्वेअर फूट आकार आणि ४५ फूट उंच ग्रॅनाइट सभागृहासह जगातील सर्वांत मोठे शटर असलेले हे गणपती मंदिर असून, ५००० भक्तांद्वारे लिखित 'ओम गं गणपतये नमः'चे २१ कोटी जप मूर्तीच्या २१ फूट खाली ठेवलेले आहेत. या मंदिराच्या गर्भागृहात वेगवेगळ्या देशातील गणपतीबाप्पांचे फोटो आहेत. थायलंड, न्यूझीलंड, ऑकलंड, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, यूएसए, नेपाळमधील सूर्यविनायक मंदिर, साउथ जॉर्डन, मॉरिशस असे अनेक विविध देशांतील गणपती या ठिकाणी चितारलेले दिसतील. या मंदिराची स्थापना जळगाव शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. मणियार यांनी केली आहे. या मंदिराच्याच परिसरात गाईंसाठी एक मोठा दवाखानाही आहे.

Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 08:16 PM News publication time | Views: 338 Number of times this news has been viewed | District: jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 08:16 PM News publication time | Views: 338 Number of times this news has been viewed | District: jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words