डहाणू किल्ला: पोर्तुगीज ते मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक साक्षीदार

डहाणू किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी; वीकेंडला ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय
डहाणू किल्ला (Dahanu Fort) हा पालघर जिल्ह्यातील डहाणू खाडीच्या किनाऱ्यावर स्थित एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे.

डहाणू किल्ला: पोर्तुगीज ते मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक साक्षीदार मुख्य फोटो
डहाणू किल्ला: पोर्तुगीज ते मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक साक्षीदार अतिरिक्त फोटो

डहाणू: पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला 'डहाणू किल्ला' सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. मुंबई आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या या ४०० वर्षे जुन्या सागरी किल्ल्याला भेट देण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.

१६ व्या शतकात पोर्तुगीजांनी सागरी संरक्षणासाठी बांधलेल्या या किल्ल्यावर आजही मजबूत तटबंदी आणि दोन ऐतिहासिक तोफा पाहायला मिळतात. सध्या या किल्ल्यात शासकीय प्रशासकीय कार्यालय कार्यरत असले, तरी याच्या मुख्य दरवाजावरील तोफा आणि खाडीचा विहंगम नजराणा अनुभवण्यासाठी इतिहासप्रेमी येथे येत असतात. शांत आणि स्वच्छ डहाणू समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या किल्ल्यामुळे डहाणूच्या पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्टेशनवरून ऑटोने अवघ्या १० ते १५ मिनिटांत या ठिकाणी पोहोचता येत असल्याने मुंबईकरांसाठी हा एक दिवसाच्या सहलीसाठी (One Day Trip) सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

डहाणू किल्ल्याजवळील प्रमुख पर्यटन स्थळे (Nearby Places) डहाणू हा परिसर त्याच्या शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि चीकूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याला भेट दिल्यानंतर तुम्ही खालील स्थळांना भेट देऊ शकता:

पर्यटन स्थळाचे नाव अंतर / वैशिष्ट्ये मुख्य आकर्षण डहाणू आणि पर्नाका बीच किल्ल्यापासून अवघ्या २०० मीटरवर अत्यंत शांत, कमी गर्दी असलेला आणि स्वच्छ काळ्या वाळूचा समुद्रकिनारा.

श्री महालक्ष्मी मंदिर (विवळवेढे) डहाणू शहरापासून साधारण २७ किमी गडावर वसलेले आणि आदिवासींचे कुलदैवत असलेले जागृत देवस्थान. येथे ९०० पायऱ्या चढून जावे लागते.

बोर्डी बीच व चीकूच्या बागा डहाणूपसून साधारण १५-१७ किमी विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि परिसरातील प्रसिद्ध चीकूच्या बागा. येथे 'चीकू महोत्सव' देखील साजरा होतो.

आसवली धरण (Asavli Dam) बोर्डी जवळ मानवनिर्मित सुंदर धरण, जे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.

बहरोट गुंफा (Bahrot Caves) बोर्डी/डहाणू जवळ डोंगराळ भागात पारशी (झोराष्ट्रीयन) धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या ऐतिहासिक गुंफा. ट्रेकर्ससाठी उत्तम जागा. चिंचणी बीच व बॅकवॉटर डहाणूच्या दक्षिणेस साधारण १२ किमी सुवर्ण वाळूचा किनारा आणि मँग्रोव्हजने वेढलेले शांत बॅकवॉटर पोर्तुगीज चर्च ऐतिहासिक नोंदींनुसार, पोर्तुगीजांनी १५९६ निर्मिती केली होती . लक्ष्मी नारायण मंदिर , मारुति मंदिर ,सिद्धेश्वर मंदिर ,मल्लिका अर्जुन किल्ला जवळील पेशवेकालीन मंदिरे किल्ल्याजवळ गणपती मंदिर सुद्धा आहे अधिक महितीसाठी संपर्क : अमृत पालघर

अमित उदय आठवले 9112226530 / 9975117807 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत ,अग्रवाल अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 05-10-2026 News publication date | Time: 09:10 AM News publication time | Views: 236 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news
Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 05-10-2026 News publication date | Time: 09:10 AM News publication time | Views: 236 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement