अमृतच्या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना मिळते आहे उच्च शिक्षणासाठी आर्थिक बळ

खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासनाच्या स्वतंत्र विभाग, महामंडळ किंवा संस्थांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी अमृतची ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

अमृतच्या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना मिळते आहे उच्च शिक्षणासाठी आर्थिक बळ मुख्य फोटो
मुख्य फोटो

जालना : आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. IIT, IIIT, AIIMS, IIM यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹१ लाख १० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती मिळत असल्याने शिक्षण शुल्क, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, निवास व इतर शैक्षणिक खर्चाचा भार कमी होण्यास मदत होत आहे.

खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासनाच्या स्वतंत्र विभाग, महामंडळ किंवा संस्थांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी अमृतची ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

जालना येथील अक्षत सचिन भारूका हे सध्या IIT नागपूर येथे B.Tech प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असून, त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. तसेच हर्षवर्धन रुईखेडकर, साक्षी मालू, प्रांजल चिक्ची आणि विराज सोडानी या विद्यार्थ्यांनाही अमृतच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.

त्याचबरोबर C-DAC, IGTR, NIELIT, उद्योग इंक्युबेशन योजना (Bhau/MSSU) यांसारख्या उच्च शिक्षणाला मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबावरील उच्च शिक्षणाचा आर्थिक भार कमी होऊन, गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येत आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी अशा योजनांची भूमिका महत्त्वाची आहे.

अमृतच्या शैक्षणिक व व्यावसायिक योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन अमृतचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत जिल्हा कार्यालय,दुसरा मजला, प्रशासकीय इमारत,जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.

मो. : ७३९१०६५४७४


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 12:02 PM News publication time | Views: 247 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 12:02 PM News publication time | Views: 247 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Suresh pokharkar
01-10-2026 12:51 PM

Mbbs student la miltil ka

Write a Comment
0 / 50 words
Advertisement