फॅशनसोबत स्वावलंबनाची नवी वाट! अमृत नांदेडकडून युवती-महिलांसाठी मोफत ३ दिवसीय ड्रेस मेकिंग प्रशिक्षण

फॅशनसोबत स्वावलंबनाची नवी वाट! अमृत नांदेडकडून युवती-महिलांसाठी मोफत ३ दिवसीय ड्रेस मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन


फॅशनसोबत स्वावलंबनाची नवी वाट! अमृत नांदेडकडून युवती-महिलांसाठी मोफत ३ दिवसीय ड्रेस मेकिंग प्रशिक्षण मुख्य फोटो
मुख्य फोटो

नांदेड | २२ सप्टेंबर २०२६ : गणपती उत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील अमृतच्या लक्षित घटकांतील युवती व महिलांसाठी **अमृत संस्था, नांदेड शाखेतर्फे मोफत ३ दिवसीय “Indian Traditional Dress Making Course” आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांना ड्रेस मेकिंगचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, तज्ज्ञ व अनुभवी महिला मार्गदर्शकांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्राथमिक माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अमृत संस्था, महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र*देण्यात येणार असून उद्यम आधार काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची बॅच २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता अमृत चे विभागीय व्यवस्थापक श्री.अमित सामंत यांच्या हस्ते उउद्घाटन होऊन प्रशिक्षणाची सुरुवात होणार आहे.

स्थळ - आराध्या गीत बुटीक अँड मॅचवेल सेंटर, नैवद्य हॉटेलसमोर, शिवाजी प्लाझा, छत्रपती चौक, नांदेड हे आहे. प्रशिक्षिका सौ. गीता राजेंद्र खेडकर असून

अधिक माहितीसाठी **अमृत कार्यालय, नांदेड – 7391065472 / 8600240032** या क्रमांकावर संपर्क साधावा. **मोफत प्रशिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून व्यवसाय आणि व्यवसायातून स्वावलंबन**, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा नांदेडमधील पात्र युवती व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 11:08 AM News publication time | Views: 174 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 11:08 AM News publication time | Views: 174 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement