**उदगीर शहराचे डीवायएसपी तथा पोलीस उपअधीक्षक मा. गजानन भातलवंडे सर यांची घरी सदिच्छा भेट**
**उदगीर शहराचे डीवायएसपी तथा पोलीस उपअधीक्षक मा. गजानन भातलवंडे सर यांची घरी सदिच्छा भेट**
आज उदगीर शहराचे डीवायएसपी तथा पोलीस उपअधीक्षक मा. गजानन भातलवंडे सर यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम तसेच समाजातील पात्र लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
अमृत संस्थेच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी, महिला व उद्योजकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच अमृत संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील कामासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नांदेड जिल्ह्यात अमृत संस्थेच्या माध्यमातून विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असून, या योजनांचा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रचार-प्रसार करण्यासाठी मा. भातलवंडे सर यांच्यासारख्या मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी **अमृत नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ कुलकर्णी** यांच्या हस्ते मा. गजानन भातलवंडे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस सहकार्याची भावना व्यक्त केल्याबद्दल मा. गजानन भातलवंडे सर यांचे मनःपूर्वक आभार.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment