प्रशासकीय तत्परता! अमृतच्या प्रशिक्षणार्थींना अवघ्या १ ते २ दिवसांत मिळणार प्रमाणपत्रे; मा. तहसीलदार भरत सूर्यवंशी यांचा कौतुकास्पद पुढाकारदेगलूर तहसील कार्यालयाचा गतिमान प्रशासनाचा वस्तुपाठ!
महाराष्ट्र राज्य 'अमृत'च्या प्रशिक्षणार्थींसाठी दिलासादायक बातमी: देगलूर तहसील कार्यालयाचा गतिमान प्रशासनाचा वस्तुपाठ!
प्रशासकीय तत्परता! अमृतच्या प्रशिक्षणार्थींना अवघ्या १ ते २ दिवसांत मिळणार प्रमाणपत्रे; मा. तहसीलदार भरत सूर्यवंशी यांचा कौतुकास्पद पुढाकार
देगलूर: शासकीय योजना आणि प्रशिक्षणांचा लाभ प्रत्येक घटकांपर्यंत वेगाने पोहोचावा यासाठी देगलूर तहसील कार्यालयाने सकारात्मक आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. 'अमृत' संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी देगलूरचे मा. तहसीलदार श्री. भरत सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेऊन अमृतच्या लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थींच्या प्रमाणपत्राबाबत चर्चा केली. यावर मा. तहसीलदारांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या एक ते दोन दिवसांत सर्व आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले आहे.
अमृत संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी रोजगाराभिमुख व कौशल्य विकास प्रशिक्षणे राबवली जातात. या प्रशिक्षणांचा लाभ अधिकाधिक तरुणांना वेळेत मिळावा, या उद्देशाने श्री. विश्वेश्वर जोशी यांनी तहसील स्तरावरील दाखले व प्रमाणपत्रे मिळण्याबाबतची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
प्रशिक्षणार्थींचे उज्ज्वल भविष्य आणि वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन मा. तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी तातडीने निर्णय घेतला. "प्रशिक्षणार्थींच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रमाणपत्रे १ ते २ दिवसांत काढून दिली जातील," अशी ग्वाही त्यांनी दिली. इतकेच नव्हे तर, प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राहावी आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीस सामोरे जावे लागू नये, यासाठी त्यांनी अत्यंत आपुलकीने स्वतःचा मोबाईल नंबरही उपलब्ध करून दिला आहे.
प्रशासकीय कामात दाखवलेली ही तत्परता, सकारात्मकता आणि सहकार्याची भावना यामुळे अमृतच्या सर्व प्रशिक्षणार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मा. तहसीलदार श्री. भरत सूर्यवंशी यांच्या या लोकाभिमुख भूमिकेबद्दल अमृतचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment