अमृतच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांची भेट अमृतच्या योजना-उपक्रमांची घेतली माहिती;

ग्राहक पंचायत समितीचे उपाध्यक्ष श्री. दीपक केशवराव कुलकर्णी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. हेमंत मधुकर मराठे यांनी अमृतच्या छत्रपती संभाजीनगर विभाग व जिल्हा कार्यालयाला भेट दिली.

अमृतच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांची भेट अमृतच्या योजना-उपक्रमांची घेतली माहिती; मुख्य फोटो
अमृतच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांची भेट अमृतच्या योजना-उपक्रमांची घेतली माहिती; अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभाग व जिल्हा कार्यालयाला ग्राहक पंचायत समितीचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मार्गदर्शक श्री. दीपक केशवराव कुलकर्णी (सेवानिवृत्त महावितरण अभियंता) आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. हेमंत मधुकर मराठे (सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी) यांनी भेट दिली.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांची अमृतचे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजयजी जोशी यांच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळी विजयजी जोशी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या जिल्हा कार्यालयाला भेट देण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी स्वतःहून फोन करून अमृतच्या कार्यालयाला भेट दिली.

यावेळी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी अमृतच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजना, प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठीचे उपक्रम तसेच लक्षित गटासाठी राबवण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती दिली. अमृतच्या कामाची पद्धत, योजनांचा फायदा आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. अमृतच्या जिल्हा टीमच्या वतीने दोन्ही मान्यवरांचे कार्यालयात स्वागत करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 11-09-2026 News publication date | Time: 01:40 PM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 11-09-2026 News publication date | Time: 01:40 PM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement