शिक्षणाबरोबर समाजाची चिंता करणारे श्री सिद्धेश्वर महाविद्यालय - प्रा. उत्तमराव कांदे

आजच्या सोशल मीडियाच्या गुंतगुंतीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची गुणात्मक संस्कारक्षम करिअर उंचावण्यासाठी त्याच्या स्वतःच्या मेहनती सोबत पालक व शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन हा महत्त्वपूर्ण आहे.असे प्रतिपादन वैद्यनाथ महाविद्यालयाचे समन्वयक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जालना विभाग संघचालक प्रा. उत्तमराव कांदे यांनी केले. ते श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या पालक मेळाव्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

शिक्षणाबरोबर समाजाची चिंता करणारे श्री सिद्धेश्वर महाविद्यालय - प्रा. उत्तमराव कांदे मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर ; आजच्या सोशल मीडियाच्या गुंतगुंतीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची गुणात्मक संस्कारक्षम करिअर उंचावण्यासाठी त्याच्या स्वतःच्या मेहनती सोबत पालक व शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन हा महत्त्वपूर्ण आहे.असे प्रतिपादन वैद्यनाथ महाविद्यालयाचे समन्वयक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जालना विभाग संघचालक प्रा. उत्तमराव कांदे यांनी केले. ते श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या पालक मेळाव्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून भा.शि.प्र संस्थेचे सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे,अध्यक्ष म्हणून भा.शि.प्र संस्थेचे केंद्रीय सदस्य व श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक प्रकाश दुगड, प्राचार्य प्रो.डॉ.मुकुंद देवर्षी, उपप्राचार्य प्रा. अंकुश साबळे, पर्यवेक्षक प्रा.परमेश्वर खेत्री, मेळाव्याचे समन्वयक प्रा. चिंतामण दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रा. कांदे म्हणाले की, पालकांशी हितगुज साधताना मुलांना केवळ शिस्तीचा बडगा उगारून जमणार नाही तर त्याच्याशी मैत्रीची नाते जपले तर ते अधिक मोकळेपणाने संवाद साधतात. उद्घाटन पर मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे म्हणाले की, पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर मर्यादित करावा तर त्याचे अनुकरण मुले करतील. कुटुंब म्हणून मोबाईल वापराची मर्यादा ठरवली तर मुलं अभ्यासाला लागतील. दहावी नंतरची ही दोन वर्ष प्रत्येक पाल्याच्या मानसिक, शारीरिक जडणघडणीसाठी महत्त्वाचे आहेत म्हणूनच मोबाईलचा वापर विद्यार्थ्यां सोबतच कुटुंबानेच मुळात तो कमी करावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य प्रो. डॉ.मुकुंद देवर्षी यांनी पालक मेळावा आयोजनामागची मुख्य भूमिका स्पष्ट केली आणि पालकांनी स्वतः बोलते झाले तर त्यामागील उद्देश हा जास्त सफल होईल असे म्हटले.

अध्यक्षीय समारोपात संस्थेचे केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे पालक प्रकाश दुगड म्हणाले की, नवीन काळाप्रमाणे आता सर्वांनी कुटुंबात वावरताना 'मोबाईल पार्किंग 'या संकल्पनेचा वापर करावा म्हणजे कुटुंबात मुख्य संवाद वाढून इतर अनेक समस्या सुटतील.

मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात शिक्षकांचा परिचय पालकांसमवेत झाला तसेच श्री थावरे, शिवराम होके या पालकांनी मनोगत व्यक्त केले.उपप्राचार्य साबळे यांनी निवेदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर व आभार प्रा.राघवेंद्र मुळी यांनी मानले . कार्यक्रमाची सांगता सामूहिक शांती मंत्राने झाली. या पालक मेळाव्यासाठी बहुसंख्य माता व पिता पालक यांची उपस्थिती होती.

अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर , लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा.


तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 11-09-2026 News publication date | Time: 10:23 AM News publication time | Views: 11 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 11-09-2026 News publication date | Time: 10:23 AM News publication time | Views: 11 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement