अमृत संस्थे अंतर्गत अहिल्यानगर मधील नेवासा तालुका येथील "उद्योजकता विकास कार्यक्रम" (EDP) प्रशिक्षणाची सुरवात आज करण्यात आली.
अहिल्यानगर : "अमृत"(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) अहिल्यानगर अंतर्गत नेवासा येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाला (EDP) आज उत्साहात सुरुवात झाली. नवउद्योजक महिलांना व्यवसायाच्या विविध पैलूंची माहिती मिळावी, त्यांच्यामध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
नेवासा येथील येथील परशुराम महिला मंडळ अध्यक्ष सौ. साधनाताई मुळे यांच्या शुभहस्ते या 10 दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले. राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजना,यामध्ये अमृत आरिवर्क, अमृत अन्नपूर्णा, अमृत इमिटेशन ज्वेलरी व अमृत फॅशन -ब्युटी पार्लर प्रशिक्षण,"अमृत पेठ–थेट बाजारपेठ", अमृत इ -कॉमर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म, यांची सविस्तर माहीती दिली.त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्र मधील CMEGP या योजनेची माहिती दिली.
प्रशिक्षण घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ क्लासेस च्या संचालिका सौ. मेघाताई परदेशी यांचे सहकार्य लाभले.प्रशिक्षण मध्ये एकूण 16 महिला लाभार्थी यांनी रजिस्ट्रेशन करून सहभाग घेतला आहे. प्रमुख मान्यवर सौ.साधनाताई मुळे यांनी उपस्तित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले कि,अमृत संस्थेच्या योजना चा प्रसार करावा व लक्षित गटातिल महिलांनी अमृत संस्थेच्या योजणांचा लाभ घ्यावा.अमृत मित्र शरद क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment