श्री.योगेश जोशी व श्री देवदत्त देशपांडे यांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट
श्री.योगेश जोशी व श्री देवदत्त देशपांडे यांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट नांदेड : श्री.योगेश जोशी आणि श्री.देवदत्त देशपांडे यांनी अमृत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी अमृत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम व लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. तसेच कार्यालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली. अमृत कार्यालयाच्या वतीने व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे आणि अमृत मित्र विश्वास बदापूरकर यांनी योगेश जोशी व देवदत्त देशपांडे यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या या सदिच्छा भेटीबद्दल कार्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment