अवयवदानातून नवजीवनाचा संदेश; शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय अकोल्यात जनजागृती कार्यक्रम उत्साहात.

१६व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त अकोल्यात पथनाट्य व विविध उपक्रमांतून ‘अवयवदान करा, जीवन वाचवा’ हा संदेश देत जनजागृती करण्यात आली.

अवयवदानातून नवजीवनाचा संदेश; शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय अकोल्यात जनजागृती कार्यक्रम उत्साहात. मुख्य फोटो
अवयवदानातून नवजीवनाचा संदेश; शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय अकोल्यात जनजागृती कार्यक्रम उत्साहात. अतिरिक्त फोटो

१६व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त १३ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, अकोला येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. “एक दाता आठ जणांचे प्राण वाचवू शकतो” या संदेशातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी देवीचे पूजन, प्रथम अवयव प्रत्यारोपण झालेल्या देवता गजाननाचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाला अतिविशेषोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. अनुप केला, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सपकाळ, विशेष कार्यासीन अधिकारी डॉ. गजानन ढाकणे आणि किडनी रोग व अवयव प्रत्यारोपण विभागप्रमुख डॉ. अमर सुलतान, मॅट्रन श्रीमती ग्रेसी अगस्टीन यांच्यासह रुग्णालयातील सर्व अधिकारी, विभागप्रमुख, डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी किडनी रोगशास्त्र विभाग व ट्रान्सप्लांट टीमच्या वतीने प्रविण देशपांडे, अक्षय चव्हाण, अनुजा भोसले, श्याम जायले आणि रोशनी अडबोल यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करण्यासोबतच अवयवदानामुळे गरजू रुग्णांना मिळणाऱ्या नवजीवनाचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. पथनाट्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी डॉ. अमर सुलतान यांनी अवयवदानाबाबत सविस्तर माहिती देत उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली. अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः जागरूक होऊन इतरांमध्येही जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जनजागृती उपक्रमाला सर्जनशीलतेची जोड देत रांगोळी, पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी विविध कलाकृती व घोषवाक्यांच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश प्रभावीपणे मांडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण देशपांडे, अनुजा भोसले, रोशनी अडबोल, अक्षय चव्हाण, श्याम जायले आणि राजेश रायपूरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सुशिल डोंगरे, रेणुका बनसोड, शुभम शिरसाठ आणि शुभम जाधव यांचे सहकार्य लाभले.

“अवयवदान करा, जीवन वाचवा” या संदेशासह नागरिकांनी अवयवदानाबाबत जागरूक होऊन कुटुंबीयांमध्येही याविषयी संवाद साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. “डोनेट ऑर्गन्स • सेव्ह लाइव्ह• गिफ्ट अ फ्युचर” या संदेशातून अवयवदान करून जीवन वाचविण्याचा आणि एखाद्याला नव्या भविष्याची अनमोल भेट देण्याचा संकल्प करण्यात आला.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 12:29 PM News publication time | Views: 316 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 12:29 PM News publication time | Views: 316 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement