स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना दर्जेदार स्वदेशी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने *अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी)* या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने लातूर येथे *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या *१२ व १३ सप्टेंबर २०२६* रोजी सकाळी *१० ते रात्री ७ वाजेपर्यंत* विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
लातूर : स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना दर्जेदार स्वदेशी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने *अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी)* या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने लातूर येथे *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या *१२ व १३ सप्टेंबर २०२६* रोजी सकाळी *१० ते रात्री ७ वाजेपर्यंत* विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील स्थानिक उत्पादक, विक्रेते व उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि थेट विक्री करण्यासाठी या उपक्रमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. *ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संपर्क निर्माण करून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे*, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रदर्शनात *कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, कलात्मक वस्तू, ज्वेलरी, हस्तकला तसेच विविध स्वदेशी उत्पादनांचे स्टॉल* असणार आहेत. त्यामुळे लातूरकरांना विविध वस्तूंची खरेदी करण्यासोबतच स्थानिक उद्योजकांच्या व्यवसायाला थेट पाठबळ देण्याची संधी मिळणार आहे.
*‘स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ आणि ग्राहकांना थेट खरेदीची संधी’* या त्रिसूत्रीवर ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाची संकल्पना आधारित आहे. या माध्यमातून लघुउद्योजकांना नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळणार आहे.
हे प्रदर्शन *सर्व नागरिकांसाठी खुले* असून लातूरकरांनी कुटुंबासह आवर्जून भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे आणि स्थानिक व्यवसायांना बळ द्यावे, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,
लातूर अमृत कार्यालय,लातूर
संपर्क क्रमांक- 7391065470
पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,
सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment