सोलापूर येथील राजश्री दिवान यांनी उभारला यशस्वी व्यवसाय! ​'अमृत' योजनेची साथ अन् जिद्दीची जोड!

​'अमृत'च्या व्याज परतावा योजनेतून सोलापूर येथील राजश्री दिवान यांचा यशस्वी उद्योजकीय प्रवास

सोलापूर येथील राजश्री दिवान यांनी उभारला यशस्वी व्यवसाय! ​'अमृत' योजनेची साथ अन् जिद्दीची जोड! मुख्य फोटो
सोलापूर येथील राजश्री दिवान यांनी उभारला यशस्वी व्यवसाय! ​'अमृत' योजनेची साथ अन् जिद्दीची जोड! अतिरिक्त फोटो

सोलापूर येथील राजश्री दिवान यांनी उभारला यशस्वी व्यवसाय! ​'अमृत' योजनेची साथ अन् जिद्दीची जोड! ​'अमृत'च्या व्याज परतावा योजनेतून सोलापूर येथील राजश्री दिवान यांचा यशस्वी उद्योजकीय प्रवास ​सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या विविध कल्याणकारी योजनांमधून राज्यातील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. सोलापूर येथील रहिवासी राजश्री रवींद्र दिवान यांनी 'अमृत' संस्थेच्या *'वैयक्तिक व्याज परतावा योजने'*चा लाभ घेत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

​या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे त्यांनी 'आशीर्वाद किराणा अँड जनरल स्टोअर्स' हे स्वतःचे दुकान सुरू केले. अत्यंत जिद्द, मेहनत आणि कुशल व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय अतिशय उत्तम रीतीने बसवला आहे. आज या किराणा आणि जनरल स्टोअरच्या माध्यमातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होत असून त्या एक यशस्वी महिला व्यावसायिक म्हणून समोर आल्या आहेत.

आपल्या या यशाबाबत भावना व्यक्त करताना राजश्री दिवान यांनी सांगितले की, "व्यवसाय सुरू करताना आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान समोर होते. परंतु 'अमृत' संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे मला मोठा दिलासा मिळाला आणि मी स्वतःचे दुकान सुरू करू शकले. आज माझा व्यवसाय उत्तम चालत असून मी आत्मनिर्भर झाले आहे.

नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अमृतची ही योजना अत्यंत वरदान ठरत असून, वेळेत मिळालेल्या या सहकार्याबद्दल राजश्री दिवान यांनी 'अमृत' संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 04-09-2026 News publication date | Time: 12:22 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 04-09-2026 News publication date | Time: 12:22 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement