सोलापुरच्या अमोल देगावकर यांना अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा मिळाला लाभ!

सोलापुरातील 'देगावकर ज्वेलर्स'ला अमृत वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे मिळाली गती!

सोलापुरच्या अमोल देगावकर यांना अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा मिळाला लाभ! मुख्य फोटो
मुख्य फोटो

सोलापुरातील 'देगावकर ज्वेलर्स'ला अमृत संस्थेचा मोठा आधार; वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे व्यवसायाला मिळाली गती!

सोलापूर:

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या ‘वैयक्तिक व्याज परतावा योजने’मुळे सोलापुरातील नवउद्योजकांच्या स्वप्नांना बळ मिळत आहे. या योजनेचा प्रभावी लाभ घेत मंगळवार पेठ येथील उद्योजक अमोल देगावकर यांनी 'देगावकर ज्वेलर्स' या आपल्या भव्य व आधुनिक दालनाची यशस्वी उभारणी केली आहे. आज हे दुकान सोलापूरकरांच्या विश्वासाचे केंद्र बनले असून व्यवसायाला मोठी गती मिळाली आहे.

श्री. अमोल देगावकर यांनी अत्यंत आकर्षक व दर्जेदार दागिन्यांच्या विविध प्रकारांसह आपला व्यवसाय सुरु केला. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि व्यवसायाचा झालेला विस्तार यामुळे हे ज्वेलरी दुकान अल्पावधीतच शहरात प्रसिद्ध झाले आहे.

​"अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे मला व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक असणारे मोठे आर्थिक पाठबळ मिळाले. या योजनेचा माझ्या व्यवसायाच्या वाढीत अत्यंत मोलाचा वाटा असून, यामुळेच मी माझे स्वप्न साकार करू शकलो," अशा शब्दांत अमोल देगावकर यांनी 'अमृत' संस्थेचे मनापासून आभार मानले.

'अमृत' संस्थेच्या या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुणांना उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र या यशोगाथेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१.

संपर्क:- ९११२२२८७६८


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 26-08-2026 News publication date | Time: 11:14 AM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 26-08-2026 News publication date | Time: 11:14 AM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement