सोलापूरच्या भालचंद्र कुलकर्णी यांना 'अमृत'च्या व्याज परतावा योजनेने मिळाला मोठा आधार!

या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे कुलकर्णी यांनी आपल्या शेती व्यवसायासाठी खरेदी केला नवीन ट्रॅक्टर .

सोलापूरच्या भालचंद्र कुलकर्णी यांना  'अमृत'च्या व्याज परतावा योजनेने  मिळाला मोठा आधार! मुख्य फोटो
मुख्य फोटो

सोलापूरचे भालचंद्र कुलकर्णी ठरले स्वावलंबी; 'अमृत'च्या व्याज परतावा योजनेचा मिळाला मोठा आभार! सोलापूर:

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अनेक गरजूंना मिळत आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील भालचंद्र रमेश कुलकर्णी यांनी वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे कुलकर्णी यांनी आपल्या शेती व्यवसायासाठी नवीन ट्रॅक्टर खरेदी केला आहे. ट्रॅक्टर आल्यामुळे त्यांच्या शेती कामाला मोठी गती मिळाली असून त्यांचा व्यवसाय आता उत्तम प्रकारे चालत आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक स्तरात देखील लक्षणीय सुधारणा झाली आहे.

​भालचंद्र कुलकर्णी यांनी 'अमृत' संस्थेचे मनापासून आभार मानले आहेत. संस्थेच्या या योजनेमुळे त्यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठी मदत मिळत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या मदतीमुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी मदत होणार आहे.


अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१.

संपर्क:- ९११२२२८७६८


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 26-08-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 26-08-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement