लोणी येथील व्यावसायिक मा.आनंद आसवा यांना मिळाला व्याज परतावा.

अहिल्यानगर मधील लोणी येथील व्यावसायिक मा.आनंद आसवा यांना अमृत संस्थेकडून मिळाला व्याज परतावा.

लोणी येथील व्यावसायिक मा.आनंद आसवा यांना मिळाला व्याज परतावा. मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : राहता तालुक्यातील लोणी येथील व्यावसायिक मा आनंद आसवा यांची जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी भेट घेतली. त्यांना अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाला असून पहिल्या टप्प्यात एकूण 44112 एवढा व्याज परतावा मिळाला आहे.याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे त्यांनी आभार मानले असून यामुळे त्यांना व्यवसायात आर्थिक पाठबळ मिळाले आहे. माहेश्वरी समाज मधील व्यावसायिक यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.तसेच माहेश्वरी समाजाचा मेळावा घेण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत,हिंदू-लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट,


आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 04:45 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 04:45 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement