नागपूरमधील तेलंगखेडी परिसरातील अंदाजे २४१ वर्षे जुने ऐतिहासिक श्री कल्याणेश्वर शिव मंदिर हे श्रद्धा आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. सन १७८५ मध्ये राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराची बांधणी केली होती. श्रावण महिन्यानिमित्त आणि विशेषतः प्रत्येक सोमवारी येथे महादेवाच्या दर्शनासाठी व जलाभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
नागपूर शहरात नाग नदीच्या व फुटाळा-तेलंगखेडी परिसराच्या सानिध्यात असलेले श्री कल्याणेश्वर शिव मंदिर हे विदर्भातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, या मंदिराची निर्मिती १७८५ मध्ये राजे रघुजी भोसले यांनी केली होती. असे मानले जाते की, राजे रघुजी भोसले आपल्या दिवसाची सुरुवात याच मंदिरातील आराध्य दैत्याचे दर्शन घेऊन करत असत. तसेच श्रावण महिन्यात भोसले राजघराण्यातील मंडळी या पूर्वमुखी मंदिरात निवास करत व पूजाअर्चा करीत असत. या प्राचीन मंदिराची रचना काळ्या आणि मजबूत पाषाणातील कोरीव कामांनी नटलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहात सुंदर शिवलिंग असून भिंतींवर गणपती, माता अन्नपूर्णा व नागदेवता यांच्या आकर्षक प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुरातत्त्वीय व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र शासना तर्फे या वास्तूला ऐतिहासिक वारसा स्थाना-ग्रेड १ (Grade-I Heritage Structure) चा दर्जा देण्यात आला आहे. काळानुरूप या मंदिराच्या व्यवस्थापनात बदल झाले असून सध्या हे परिसर अत्यंत शांत, निसर्गरम्य आणि स्वच्छ राखला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे विशेष भजन, कीर्तन आणि महापूजा आयोजित केली जाते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment