वर्धा जिल्हा कार्यालयात अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) वर्धा जिल्हा कार्यालय येथे अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, नेतृत्वगुण, राष्ट्रनिष्ठा आणि अद्वितीय युद्धनीतीचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयम संघाचे नगर कार्यवाह अक्षयजी शिंगरुप, ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेकजी देशपांडे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासजी दांडगे आणि इतर नागरिक उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क: अमृत वर्धा जिल्हा कार्यालय, प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन,वर्धा
मोबाइल नंबर:9112227632
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment