वाशिम जिल्ह्यात युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी; ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन

जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन

वाशिम जिल्ह्यात युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी; ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाशिम : जिल्ह्यातील सुशिक्षित व रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत विशेष ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पात्र युवकांना थेट मुलाखतीद्वारे प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तळमजला, खोली क्रमांक ११, वाशिम येथे करण्यात आले आहे.


या उपक्रमामध्ये जिल्हा आरोग्य कार्यालय, वाशिम येथे CMYKPY Trainee पदासाठी ११ महिन्यांच्या प्रशिक्षणाकरिता २ पदे, तालुका कृषी कार्यालय, मंगरूळपीर येथे १ पद तसेच श्री रामराव गोपालराव झनक शिक्षण संस्था, मालेगाव येथे ६ पदे उपलब्ध आहेत. या सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे असून, पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीची संधी मिळणार आहे.


या योजनेअंतर्गत शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण / डिप्लोमा / पदवी अशी असून, युवकांना संबंधित आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तसेच रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.


आवश्यक कागदपत्रे


इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना १० वी, १२ वी, पदवीची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे, डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्र, आधारकार्ड, अनुभव प्रमाणपत्र (असल्यास), बायोडाटा तसेच पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.


उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी CMYKPY च्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधेचा वापर करता येईल.


जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन थेट मुलाखतीद्वारे प्रशिक्षण व रोजगाराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8149300955, 9552369913


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 04:14 PM News publication time | Views: 151 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 04:14 PM News publication time | Views: 151 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement