ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांच्या व्याख्यानाचे आयोजन
अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले, आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ सेनानींपैकी एक मानले जातात. त्यांचे धैर्य, दूरदृष्टी, राष्ट्राभिमान आणि विजिगीषू वृत्ती आजच्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभी राहावी, यासाठीच हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा परिचय जनतेला, विशेषतः युवकांना होण्यासाठी महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांचा राज्यव्यापी दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्याची सुरुवात नाशिक विभागापासून झाली असून मराठवाडा, अमरावती, आणि नागपूर विभाग, त्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा दौरा होणार आहे. जगन्नाथ लडकत हे 'समर्थ पुणे परिवार' या संस्थेचे संस्थापक असून सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. ते संस्कृती प्रतिष्ठान, पुणेचे मुख्य विश्वस्त आहेत. इतिहास विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास असून त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात दोन हजारांहून अधिक पुस्तके आहेत. गडकिल्ल्यांवर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन, 'अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई' या विषयावर राज्यभरातील २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसमोर व्याख्याने, बाजीराव पेशव्यांवरील बुकमार्कचे प्रकाशन व वितरण तसेच 'प्रतापी पेशव्यांचे आयुष्यमान व शनिवारवाडा' या विषयावर शोधनिबंध लेखन अशी त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. सध्या ते अठराव्या शतकाच्या इतिहासाचा अभ्यास करत असून विविध वृत्तपत्रांमध्ये इतिहास विषयक लेखनही करीत आहेत. या महाराष्ट्र दौऱ्याअंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मा.श्री.जगन्नाथ लडकत यांचा चंद्रपूर दौरा व्याख्यान खालीलप्रमाणे- विषय- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि पालखेडची लढाई दिनांक- १३ ऑगस्ट २०२६ वेळ- सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत स्थळ- सोमय्या पॉलिटेक्निक, चंद्रपूर अधिक महितीसाठी संपर्क - 9112228774
अमृत जिल्हा कार्यालय चंद्रपूर पत्ता - कृष्णा टावर जवळ, गुरुद्वारा रोड तुकूम, चंद्रपूर
Comments 1 Comments
kartik tiwari
Jay Maharashtra, एकमेव अंजिक्य योद्धा बाजीराव पेशवे
Write a Comment