कास पठारावर फुलांचा मोसम आकारास; साताऱ्यातील धबधबे आणि निसर्ग पर्यटनाला उधाण
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पश्चिम घाटातील निसर्गसौंदर्य पूर्ण वैभवात आले असून, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या जगप्रसिद्ध कास पठारावर फुलांच्या हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. चालू ऑगस्ट महिन्यात कास पठारावर विविध प्रकारच्या दुर्मिळ, रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास सुरुवात झाली असून लवकरच हे पठार निसर्गप्रेमींसाठी निसर्गाची अद्भूत किमया घेऊन सज्ज होणार आहे.
कास पठारावर उमलणाऱ्या दुर्मिळ रानफुलांची सृष्टी अनुभवण्यासाठी दरवर्षी देशभरातून हजारो पर्यटक साताऱ्यात हजेरी लावतात. सध्याच्या काळात पठारावर कळ्या आणि लहान फुलांचे नयनरम्य दृश्य दिसू लागले असून, येत्या काही आठवड्यांत रंगीबेरंगी फुलांची हिरवी-जांभळी-पिवळी चादर पसरलेली पाहायला मिळेल. वनविभाग आणि कास पठार कार्यकारी समितीकडून पर्यटकांच्या स्वागतासाठी व सुरक्षेसाठी आवश्यक ती पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे.
धबधबे वाहू लागले पूर्ण क्षमतेने-
ऑगस्ट महिन्यातील मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील प्रमुख धबधबे सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच मानला जाणारा भांबवली वजराई धबधबा, तसेच जगप्रसिद्ध ठोसेघर धबधबा सध्या पूर्ण वैभवाने ओसंडून वाहत आहेत. याशिवाय कोयना आणि महाबळेश्वर परिसरातील निसर्गरम्य दऱ्या आणि हिरवेगार डोंगर निसर्गप्रेमींना भुरळ घालत आहेत.
रस्ते मार्गाने (बाय रोड)
रेल्वे मार्गाने (बाय ट्रेन)
कास पठाराच्या आजूबाजूला कास तलाव, वजराई व ठोसेघर धबधबे, सज्जनगड आणि अजिंक्यतारा किल्ला ही प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत.
विमान मार्गाने (बाय एअर)
आजूबाजूची प्रमुख प्रेक्षणीय स्थळे-
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment