कस्तुरी जनरल किराणा स्टोअर्स'च्या माध्यमातून उभारला स्वावलंबनाचा भक्कम पाया.
सोलापूर मधील 'वैयक्तिक व्याज परतावा' योजनेने बार्शीच्या प्रियंका देशपांडे बनल्या यशस्वी उद्योजिका! कस्तुरी जनरल किराणा स्टोअर्स'च्या माध्यमातून उभारला स्वावलंबनाचा भक्कम पाया. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)' संस्थेच्या विविध जनकल्याणकारी योजना सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहेत. अमृत संस्थेच्या 'वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा' लाभ घेऊन बारशी येथील सौ. प्रियंका दीपक देशपांडे यांनी स्वतःचा 'मे. कस्तुरी जनरल किराणा स्टोअर्स' हा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू करून महिला सक्षमीकरणाचा एक उत्तम आदर्श वस्तुपाठ समोर ठेवला आहे. बारशी रोड, बारशी येथील रहिवासी असलेल्या सौ. प्रियंका देशपांडे यांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची जिद्द होती. परंतु, सुरुवातीच्या आर्थिक भांडवलाची उभारणी करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी अमृत (AMRUT) संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत अर्ज केला. योजनेच्या सहकार्यातून त्यांना बँकेचे कर्ज सुलभतेने उपलब्ध झाले आणि कर्जावरील व्याजाचा परतावा अमृत संस्थेकडून वेळेवर मिळाल्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण खूप कमी झाला. या योजनेच्या बळावर त्यांनी बारशी रोड येथे 'मे. कस्तुरी जनरल किराणा स्टोअर्स' ची स्थापना केली. आज त्या या दुकानाचा कारभार अत्यंत कौशल्याने आणि जिद्दीने सांभाळत आहेत. किराणा आणि दैनंदिन गरजेच्या दर्जेदार वस्तू ग्राहकांना पुरवून त्यांनी अल्पावधीतच परिसरात चांगला ग्राहकवर्ग जोडला आहे आणि एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून नाव कमावले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना सौ. प्रियंका देशपांडे म्हणाल्या की, " नवीन व्यवसाय सुरू करताना आर्थिक नियोजन आणि व्याजाचा भार ही सर्वात मोठी चिंता असते. पण 'अमृत' संस्थेच्या 'वैयक्तिक व्याज परतावा योजनेने' मला खूप मोठा दिलासा आणि पाठबळ दिले. अमृत संस्थेच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच मी आज स्वतःच्या पायावर उभी राहू शकले आहे. माझ्या या यशाचे श्रेय मी पूर्णपणे 'अमृत' संस्थेला देते आणि त्यांची मनापासून ऋणी आहे."
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११ २२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment