वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत हिंगोलीच्या श्री. नरेंद्रकुमार अग्रवाल यांना लाभला व्याजपरतावा!

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थी श्री. नरेंद्रकुमार अग्रवाल यांना व्याज परतावा मिळाला आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत हिंगोलीच्या श्री. नरेंद्रकुमार अग्रवाल यांना लाभला व्याजपरतावा! मुख्य फोटो
मुख्य फोटो

हिंगोली : वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत व्याज परतावा (Interest Claim) साठी अर्ज केलेले लाभार्थी श्री. नरेंद्रकुमार अग्रवाल यांना व्याज परताव्याचा लाभ झाला आहे.या लाभाआधी त्यांच्या व्यवसायाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. या पाहणीदरम्यान लाभार्थ्याचा व्यवसाय प्रत्यक्ष सुरू आहे किंवा नाही, व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायासाठी वापरण्यात येणारी साधने व साहित्य तसेच घेतलेल्या कर्जाचा व्यवसायासाठी योग्य प्रकारे वापर करण्यात आला आहे किंवा नाही, याबाबत आवश्यक माहिती घेण्यात आली होते.

यावेळी योजनेच्या निर्धारित निकषांनुसार लाभार्थ्याच्या व्यवसायाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कागदपत्रे व संबंधित बाबींची पडताळणी करण्यात आली . त्यानंतर त्यांना हा लाभ झाला आहे. आता त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवता येईल आणि त्यायोगे त्यांची आर्थिक उन्नती होणार आहे.या अमुल्य मदतीसाठी त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७१

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 11:51 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 11:51 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement