व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या उद्योजकांना अमृतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अनेकांसाठी आधारवड ठरत आहे. या योजनेचा लाभ घेत निरंजन अनेगिरीकर यांना सलग चार टप्प्यांमध्ये व्याज परताव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.
व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या उद्योजकांना आर्थिक दिलासा देणारी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अनेकांसाठी आधारवड ठरत आहे. या योजनेचा लाभ घेत निरंजन अनेगिरीकर यांना सलग चार टप्प्यांमध्ये व्याज परताव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.
व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी निरंजन अनेगिरीकर यांनी बँकेकडून व्यवसाय कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. कर्ज मंजुरीपूर्वी त्यांनी अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून उपलब्ध योजनांची माहिती घेतली.
यावेळी अमृतच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच व्याज परतावा लेटर मिळविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.अमृतकडून व्याज परतावा लेटर प्राप्त झाल्यानंतर निरंजन अनेगिरीकर यांनी बँकेकडून व्यवसाय कर्ज मंजूर करून घेतले. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची त्यांनी नियमित व वेळेवर परतफेड केली. त्यामुळे अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांना सलग चार टप्प्यांमध्ये व्याज परताव्याचा लाभ मिळाला.
या योजनेमुळे व्यवसायावरील व्याजाचा आर्थिक भार कमी झाला असून व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक आर्थिक स्थैर्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
सलग चार टप्प्यांमध्ये व्याज परतावा मिळाल्यानंतर निरंजन अनेगिरीकर यांनी अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, "अमृतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळत असल्याने व्यवसायातील आर्थिक जबाबदाऱ्या पेलणे अधिक सोपे होते. या योजनेचा लाभ घेतल्यामुळे माझ्या व्यवसायाला मोठा आधार मिळाला असून पात्र उद्योजकांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा."
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६४
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment