वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून मिळालेल्या अर्थसाहाय्याने 'प्रकाश स्टेशनर्स & प्रिंटर्स'चा यशस्वी विस्तार!
सोलापूरचे राजकुमार भंडारी यांचा उद्योग क्षेत्रात भरारी; 'प्रकाश स्टेशनर्स & प्रिंटर्स'चा यशस्वी विस्तार! सोलापूर: अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा अत्यंत लाभदायी उपयोग करत सोलापूर येथील तरुण उद्योजक राजकुमार विजय भंडारी यांनी आपल्या व्यवसायाचा मोठा विस्तार केला असून एक नवीन यशस्वी ओळख निर्माण केली आहे. 'अमृत' योजनेच्या पाठबळामुळे त्यांच्या व्यवसायाला एक मोठी चालना मिळाली आहे. राजकुमार भंडारी यांनी या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक आणि तांत्रिक पाठबळाचा योग्य वापर करत 'प्रकाश स्टेशनर्स & प्रिंटर्स' या नावाने आपला व्यवसाय अधिक सक्षम केला आहे. स्टेशनरी, झेरॉक्स, लॅमिनेशन, स्पायरल बाइंडिंग आणि ऑफिस स्टेशनरी यांसारख्या विविध सेवांच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. 'अमृत' योजनेच्या कर्ज व्याज परतावा सुविधेमुळे व्यवसायातील भांडवली अडचण दूर होऊन नवीन उपक्रम सुरू करणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यवसायाचा पत्ता: प्रकाश स्टेशनर्स & प्रिंटर्स, श्रीराम अपार्टमेंट, समर्थ चौक, प्रभाकर महाराज मंदिराजवळ, सोलापूर - ४१३००२. 'अमृत' योजनेचा लाभ घेण्याचे सोलापूरकरांना आवाहन अधिक माहिती व संपर्कासाठी: अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१. संपर्क क्रमांक: ९११२२२८७६८ / ८६६९५८९८३४ / ९२८४४८३२१६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment