अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून कोल्हापूरच्या कर्ण गुळवणी यांना व्याज परतावा

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा कर्ण पांडुरंग गुळवणी यांना लाभ प्राप्त झाला आहे. कर्जाचे हप्ते नियमित आणि वेळेवर भरल्यामुळे त्यांना या योजनेमुळे सलग चार टप्प्यांमध्ये सातत्याने अमृतमार्फत त्यांच्या बँक खात्यात व्याज परताव्याची रक्कम थेट जमा करण्यात आली.

अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून कोल्हापूरच्या कर्ण गुळवणी यांना व्याज परतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा कर्ण पांडुरंग गुळवणी यांना लाभ प्राप्त झाला आहे. हे करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचे रहिवाशी असून फार्मास्यूटिकल व्यावसायिक आहेत त्याचबरोबर त्यांनी कर्जाचे हप्ते नियमित आणि वेळेवर भरल्यामुळे त्यांना या योजनेमार्फत सलग चार टप्प्यांमध्ये सातत्याने अमृतमार्फत त्यांच्या बँक खात्यात व्याज परताव्याची रक्कम थेट जमा करण्यात आली.

व्यवसायाच्या विस्तारासाठी कर्ण पांडुरंग गुळवणी यांनी बँकेकडून व्यवसाय कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी अमृतच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची सविस्तर माहिती देत आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, व्याज परतावा लेटर मिळविण्याची पद्धत तसेच पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर अमृतकडून व्याज परतावा लेटर मिळाल्यानंतर त्यांनी बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतले. कर्जाचे सर्व हप्ते नियमित भरल्यामुळे अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांना व्याज परतावा मिळाला. या योजनेमुळे व्यवसायावरील आर्थिक भार कमी होऊन व्यवसायाच्या वाढीस मोठी मदत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

व्याज परतावा मिळाल्यानंतर कर्ण पांडुरंग गुळवणी यांनी अमृतच्या जिल्हा कार्यालयाला संपर्क करून संपूर्ण टीमचे आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे माझ्या व्यवसायाला मोठा आधार मिळाला आहे. नियमित कर्जफेड केल्यास व्याज परतावा मिळत असल्याने आर्थिक दिलासा मिळतो. खुल्या प्रवर्गातील उद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा."

व्यवसाय सुरू करायचा असो किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असो, अमृतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना खुल्या प्रवर्गातील उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहायासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाच्या प्रगतीला गती द्यावी, असे आवाहन अमृततर्फे करण्यात आले.


अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६४


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Prashant Arun Joshi News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 05:36 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Arun Joshi News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 05:36 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement