महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासकांसाठी अमृतचे आवाहन

अमृत संस्थेच्या साथीने महाराष्ट्राचा हा समृद्ध कर्तृत्वरुपी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अमृत पराक्रम दिन व्याख्यानमालेमध्ये वक्ता म्हणून प्रखर प्रेरणादायक विचार मांडण्याची संधी.

महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासकांसाठी अमृतचे आवाहन मुख्य फोटो
मुख्य फोटो

अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले, आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ सेनानींपैकी एक मानले जातात. त्यांचे धैर्य, दूरदृष्टी, राष्ट्राभिमान आणि विजिगीषू वृत्ती आजच्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभी राहावी, यासाठीच एक प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा परिचय जनतेला, विशेषतः युवकांना होण्यासाठी म्हणून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेल्या आहे. त्यासाठी अमृत पराक्रम दिनानिमित्त इतिहास तज्ञ मा. श्री जगन्नाथजी लडकत यांचा महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर अभ्यास करणारे अनेक अभ्यासक आहेत आणि त्यांना सुद्धा जर या अमृत पराक्रम दिन व्याख्यानमालेमध्ये वक्ता म्हणून प्रखर प्रेरणादायक विचार मांडण्याची इच्छा असेल तर अमृत पराक्रम दिनानिमित्त महाराष्ट्र दौरा करणारे इतिहास तज्ञ मा. श्री जगन्नाथजी लडकत किंवा संबंधित जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक किंवा विभागीय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. अशाप्रकारे तुम्ही अमृत संस्थेच्या साथीने महाराष्ट्राचा हा समृद्ध कर्तृत्वरुपी वारसा पुढील पिढीला देऊ शकता. यामुळे आपणही या अनोख्या उपक्रमाचा एक भाग बनू शकता. यानिमित्ताने आपले विचार असंख्य लोकांपर्यंत पोहोचवू शकता. खरंतर हे एकप्रकारे राष्ट्रकार्यच आहे. तेव्हा अमृत संस्थेतर्फे अशा विद्वान गुणीजनांना हे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे-

https://mahaamrut.org.in/coordinators-contact

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 02:12 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 02:12 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement