अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत अकोल्यातील ट्रान्सपोर्ट उद्योजक गणेश वाघमारे यांना ₹३७,४४३ चा व्याज परतावा मिळाला असून, या योजनेमुळे उद्योजकांना आर्थिक दिलासा व व्यवसायवृद्धीस प्रोत्साहन मिळत आहे.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत अकोला येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक गणेश वाघमारे यांना ₹३७,४४३ इतका व्याज परतावा प्रदान करण्यात आला आहे.
उद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळावे, व्यवसाय वृद्धीस चालना मिळावी आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अमृतमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गणेश वाघमारे यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा या योजनेअंतर्गत प्राप्त केला.
या योजनेमुळे उद्योजकांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होत असून व्यवसाय विस्तारासाठीही बळ मिळत आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक, उद्योजक व स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनी अमृतच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.
अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळत असून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेमार्फत केले जात आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२२७६३६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment