अमृत पराक्रम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे व्याख्यानांचे आयोजन

इतिहास तज्ञ आणि अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत सांगणार थोरल्या बाजीरावांची शौर्याची, पराक्रमाची व राष्ट्रनिष्ठेची गाथा

अमृत पराक्रम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे व्याख्यानांचे  आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने राज्यभरात १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले, आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ सेनानींपैकी एक मानले जातात. त्यांचे धैर्य, दूरदृष्टी, राष्ट्राभिमान आणि विजिगीषू वृत्ती आजच्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभी राहावी, यासाठीच हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

थोरले बाजीराव पेशवे यांनी निजामाविरुद्ध जो संघर्ष केला आणि सन १७२८ मध्ये इतिहासातील प्रसिद्ध पालखेडची जी लढाई झाली त्याची पार्श्र्वभूमी संभाजीनगर मोहिमेतूनच तयार झाली होती. अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा परिचय जनतेला, विशेषतः युवकांना होण्यासाठी म्हणून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेल्या आहे.

या दौऱ्याची सुरुवात नाशिक विभागापासून होणार असून मराठवाडा, अमरावती, आणि नागपूर विभाग, त्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा दौरा होणार आहे.

यात दिनांक ७ आणि ८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे दौऱ्याचे आयोजन आहे.

या अंतर्गत मा.श्री.जगन्नाथ लडकत यांच्या दिनांक ७ आणि ८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्याची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे -

१. दिनांक:- ०७/०८/२०२६
माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा छत्रपती संभाजीनगर.
कार्यक्रम वेळ :- सकाळी ११:०० वाजता

२. दिनांक :- ०७/०८/२०२६.
ब्राह्मण समाज समन्वय समिती छत्रपती संभाजीनगर, स्वामी रामानंद तीर्थ सभागृह.
कार्यक्रम वेळ :- संध्याकाळी ६:०० वाजता.

३. दिनांक :- ०८/०८/२०२६.
सरस्वती भवन शैक्षणिक संस्था.
कार्यक्रम वेळ :- सकाळी ७:०० वाजता

वरील कार्यक्रमास युवक, महिला,विद्यार्थी,शिक्षक, पालक यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 11:57 AM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 11:57 AM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement