अमृत संस्थेच्या शैक्षणिक अर्थसहाय्यामुळे सांगलीच्या मंदार पागे याला मिलांर आयआयटी मद्रासमध्ये उच्च शिक्षणाची संधी.
सांगली:
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील गुणवंत विद्यार्थी मंदार पागे यांनी देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असणाऱ्या 'आयआयटी मद्रास' (IIT Madras) मध्ये प्रवेश मिळवला आहे.
मंदार पागे यांना अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या 'शैक्षणिक अर्थसहाय्य योजने'ची माहिती मिळाली. त्यानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यांचा हा अर्ज मंजूर झाला असून, अमृत संस्थेकडून मंदार पागे यांना पहिल्या सहामाहीच्या शिक्षणासाठी ६०,००० रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला आहे.
मंदारने मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल आणि आयआयटीमधील प्रवेशाबद्दल संपूर्ण सांगली जिल्ह्यातून त्याचे कौतुक होत आहे. आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी अमृत संस्थेकडून विविध योजनांद्वारे विद्यार्थ्यांना मदत केली जाते. या योजनेचा थेट फायदा मंदारला झाला असून पहिल्या सहामाहीसाठी त्याला हा आर्थिक लाभ मिळाला आहेत.
या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मंदार पागे म्हणाले, "अमृत संस्थेच्या या मोलाच्या शैक्षणिक अर्थसहाय्यामुळे मला आयआयटी मद्राससारख्या नामांकित संस्थेत कोणतेही आर्थिक दडपण न घेता शिक्षण सुरू करता आले. योग्य वेळी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज मंजूर केल्याबद्दल आणि माझ्या स्वप्नांना बळ दिल्याबद्दल मी अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो."
संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडे खुली होत आहे. मंदारच्या या यशाबद्दल अमृत संस्थेचे पदाधिकारी,अणि ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करत पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक माहिती साठी संपर्क:-
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत), सांगली जिल्हा कार्यालय, अप्पर तहसील कार्यालया समोर, राजवाडा, सांगली 416416 जिल्हा कार्यालय:-9112228766
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment