इतिहास तज्ञ आणि अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत सांगणार थोरल्या बाजीरावांचा शौर्याची, पराक्रमाची व राष्ट्रनिष्ठेची गाथा
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने राज्यभरात १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले, आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ सेनानींपैकी एक मानले जातात. त्यांचे धैर्य, दूरदृष्टी, राष्ट्राभिमान आणि विजिगीषू वृत्ती आजच्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभी राहावी, यासाठीच हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा परिचय जनतेला, विशेषतः युवकांना होण्यासाठी म्हणून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेल्या आहे. या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात उद्या दिनांक ५ ऑगस्ट पासून अहिल्यानगर येथून होत आहे.
या दौऱ्याची सुरुवात नाशिक विभागापासून होणार असून मराठवाडा, अमरावती, आणि नागपूर विभाग, त्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा दौरा होणार आहे.
या अंतर्गत मा.श्री.जगन्नाथ लडकत यांचा अहिल्यानगर दौरा
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ आणि दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित केला आहे.त्याची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे -
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी
वेळ - सायंकाळी ५ वाजता
ठिकाण :-अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्र समोर,
प्रोफेसर चौक, सावेडी,
अहिल्यानगर -414003
आणि
दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी
वेळ :- सकाळी ११ ते १२
ठिकाण :-प्रगत विद्यालय,गांधी मैदान, अहिल्यानगर व त्याच दिवशी
श्री समर्थ विद्यार्थी मंदिर महाविद्यालय
सावेडी, अहिल्यानगर
वेळ :-1 ते 2
असा दोन दिवसीय दौरा आयोजन आहे.
या दोन्ही व्याख्यांसाठी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी , पालक, शिक्षक, युवकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक :-9112228769
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment