यावर्षीच्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासात भारताला ज्युदो या क्रीडाप्रकारात प्रथमच सुवर्णपदक मिळाले.
स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या जुडोपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत देशाच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा पराक्रम केला आहे. अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी आपल्या-आपल्या वजनी गटात सुवर्णपदक पटकावत कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात भारताला प्रथमच जुडो प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अस्मिता डे हिने कॅनडाच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत सुवर्णपदक जिंकले. तिचा हा विजय केवळ वैयक्तिक यश नसून भारतीय जुडोसाठी ऐतिहासिक ठरला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये वडिलांच्या निधनानंतरही तिने खचून न जाता कठोर मेहनत घेतली. त्यानंतर राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये यश मिळवत तिने ग्लास्गोमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. विजयानंतर भावना व्यक्त करताना अस्मिता म्हणाली, “हे सुवर्णपदक माझ्यासाठी, माझ्या राज्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मी हा विजय माझ्या प्रशिक्षकाला समर्पित करते दुसरीकडे, पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात भारताच्या हर्ष सिंग याने ऑस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. त्याच्या दमदार आणि आक्रमक खेळामुळे भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर पडली आणि भारतीय जुडोचा नवा अध्याय लिहिला गेला भारतीय खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशाचे देशभरातून स्वागत होत असून क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सामाजिक माध्यमांद्वारे अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांचे अभिनंदन करत त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. देशा साठी अभिमानाचा दिवस.. या दुहेरी सुवर्णामुळे भारताच्या पदकतालिकेत मोठी भर पडली असून ग्लास्गोतील कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची कामगिरी अधिक भक्कम झाली आहे. भारतीय खेळाडूंच्या या यशामुळे देशभरातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याचे क्रीडा तज्ज्ञांचे मत आहे.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment