महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात MPSC चे शुद्धीपत्रक जाहीर; नव्या पदांचा समावेश, एकूण ३,०८८ पदांसाठी भरती प्रक्रिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ संदर्भात महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले असून, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत काही महत्त्वाचे बदल आणि नव्या पदांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात MPSC चे शुद्धीपत्रक जाहीर; नव्या पदांचा समावेश, एकूण ३,०८८ पदांसाठी भरती प्रक्रिया मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ संदर्भात महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले असून, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत काही महत्त्वाचे बदल आणि नव्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीनेच घेतली जाणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे-
१. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार-
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ ची जाहिरात क्रमांक ०७५/२०२६ -दिनांक २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झाली होती. सदर परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
२. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत वाढ-
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली होती.
३. नव्या पदांचा समावेश-
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ०५ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार काही नवीन सेवांचा समावेश महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा – २०२६ मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत एकूण ३,०८८ पदांचा समावेश करण्यात आला आहे.
विभागनिहाय पदांची माहिती-
१. महसूल व वन विभाग
पदनाम : ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकरी)
एकूण पदे : १,५३४
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सर्व शाखांतील पदवी
अर्जाची अंतिम तारीख : २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत (सेवा प्रवेश नियमांनुसार)

२. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई
पदनाम : वरिष्ठ कार्यालयलिपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल, गट-क
एकूण पदे : ११
आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : जाहिरातीनुसार ०४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू

३. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई
पदनाम : सहाय्यक अधीक्षक, गट-क
एकूण पदे : ११
आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : शासन सेवेत असलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची शिथिलता

४. कृषी व पदुम (मत्स्य) विभाग
पदनाम : सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क
एकूण पदे : २५५
आवश्यक पात्रता : मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील B.F.Sc. पदवी
अर्जाची अंतिम तारीख : जाहिरातीनुसार ०४ ऑक्टोबर २०२६

५. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालये
पदांचा समावेश करण्यात आलेला आहे
एकूण पदे : २३०

६. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
पदनाम : लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकरी)
एकूण पदे : १५५
आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
जाहिरातीत नमूद केलेली लिपिक-टंकलेखक पदासाठी आवश्यक टंकलेखन पात्रता
अर्जाची अंतिम तारीख : जाहिरातीनुसार ०४ ऑक्टोबर २०२६

७. आदिवासी विकास विभाग
पदांचा समावेश करण्यात आलेला आहे - एकूण पदे : ६९

८. महसूल व वन विभाग
पदांचा समावेश करण्यात आलेला आहे- एकूण पदे : ४८०

९. महसूल व वन विभाग
पदनाम : लिपिक-टंकलेखक, नोंदणी व मुद्रांक विभाग
एकूण पदे : ३४३
आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
लिपिक-टंकलेखक पदासाठी आवश्यक टंकलेखन पात्रता

एकूण पदसंख्या

वरील सर्व विभागांतील पदांचा विचार करता एकूण ३,०८८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

आरक्षणासंदर्भातील महत्त्वाची सूचना
आयोगाने स्पष्ट केले आहे की, विविध संवर्गांतील पदांचा, सामाजिक व समांतर आरक्षणासह पदसंख्येचा, तसेच शासनाकडून सुधारित / अतिरिक्त / स्वतंत्र मागणीपत्रांद्वारे प्राप्त होणाऱ्या नवीन पदांचा समावेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येऊ शकतो.

MPSC च्या या शुद्धीपत्रकामुळे महाराष्ट्रातील पदवीधर आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, नव्या पदांच्या समावेशामुळे भरतीच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

अमृत च्या लक्षित गटातील सर्व इच्छुक उमेदवार विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या जाहिरातीतील पदांसाठी अवश्य अर्ज करावा. मागील दोन वर्षांपासून टंकलेखन GCC -TBC प्रशिक्षणापासून ते इतर विविध माध्यमातून अमृत संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन दिल्या जात आहे. याचा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि परिपूर्ण अर्ज MPSC च्या जाहिरातीनुसार भरावा.. भरपूर अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त संख्येने यशस्वी व्हावे.
अमृत कडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.!!

-महाराष्ट्र शासन लोकसेवा आयोग, निवेदन

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-08-2026 News publication date | Time: 03:45 PM News publication time | Views: 138 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-08-2026 News publication date | Time: 03:45 PM News publication time | Views: 138 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement