अमृत पर्यटन स्थानिक व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची नोंदणी करून पर्यटनाशी जोडण्याचे आवाहन करत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक व्यवसायांना अधिक ग्राहक मिळतील, रोजगाराच्या संधी वाढतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. "आपला व्यवसाय नोंदवा, अमृत पर्यटनासोबत व्यवसाय वाढवा" हा या उपक्रमाचा मुख्य संदेश आहे.
अमृत पर्यटन उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उद्योजक, व्यावसायिक, कारागीर, हॉटेल, रेस्टॉरंट, होमस्टे, ट्रॅव्हल सेवा, हस्तकला विक्रेते आणि इतर सेवा पुरवठादारांना आपल्या व्यवसायाची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे पर्यटकांना स्थानिक दर्जेदार सेवा सहज उपलब्ध होतील, तर स्थानिक व्यावसायिकांना अधिक ग्राहक आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देत पर्यटन विकासात प्रत्येक व्यवसायाचा सहभाग वाढविण्याचा AMRUT पर्यटनाचा प्रयत्न आहे.
"आपला व्यवसाय नोंदवा –https://amrutparytan.com/
https://app.mahaamrut.org.in/amrut-new/
स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठबळ द्या. अमृत पर्यटनासोबत आपला व्यवसाय वाढवा!" या संदेशाद्वारे सर्व व्यावसायिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमृत पर्यटन हे केवळ पर्यटनाला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ नसून, स्थानिक उद्योग, संस्कृती आणि रोजगाराच्या संधींना बळ देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment