सोलापूर जिल्ह्यातील 'अमृत' लाभार्थी अथर्व बुडूख यांचे यश; बार्शीत हॉटेल व्यवसायाची यशस्वी सुरुवात
सोलापूर जिल्ह्यातील 'अमृत' लाभार्थी अथर्व बुडूख यांचे यश; बार्शीत 'हॉटेल सारंगी प्युअर व्हेज'चा दबदबा! कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी). या संस्थेच्या 'वैयक्तिक व्याज परतावा योजने'चा लाभ घेऊन बार्शी येथील एका तरुण उद्योजकाने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. अथर्व सचिन बुडूख या उच्चशिक्षित तरुणाने पारंपारिक नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुभाष नगर, बार्शी येथे 'हॉटेल सारंगी प्युअर व्हेज' या नावाने एक उत्तम दर्जाचे हॉटेल सुरू केले आहे. स्वच्छ आणि सात्विक जेवणासाठी 'हॉटेल सारंगी' अल्पावधीतच बार्शीकरांमध्ये लोकप्रिय झाले आहे. या यशाचे श्रेय देताना अथर्व बुडूख यांनी 'अमृत' योजनेचे मनापासून कौतुक केले आहे. "स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती, पण भांडवलाची अडचण होती. 'अमृत' च्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेबद्दल माहिती मिळाली आणि मी त्यासाठी अर्ज केला. या योजनेमुळे मला बँकेकडून कर्ज मिळणे सोपे झाले आणि व्याजाचा बोजाही कमी झाला. या मदतीमुळेच आज 'हॉटेल सारंगी' ताठ मानेने उभे आहे. हॉटेल सारंगी' च्या यशातून हे सिद्ध होते की, जर तरुणांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळाली, तर ते यशस्वी उद्योजक बनून आत्मनिर्भर होऊ शकतात. 'अमृत' संस्था अशाच अनेक स्वप्नांना पंख देत आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. सोलापूर जिल्ह्यातून 'अमृत' योजनेच्या माध्यमातून तरुणांना आत्मनिर्भर बनवण्याचा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. पत्ता: अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय,सोलापूर, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१ संपर्क क्रमांक: 9112228768 / 8669589834 / 9284483216
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment