देगाव येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) बॅचचा उत्साहात शुभारंभ

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने अमृत उद्यम लघु प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी (दि. २७ जुलै) धुळे जिल्ह्यातील देगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

देगाव येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) बॅचचा उत्साहात शुभारंभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

देगाव येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) बॅचचा उत्साहात शुभारंभ

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने अमृत उद्यम लघु प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी (दि. २७ जुलै) धुळे जिल्ह्यातील देगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण करून त्यांना स्वयंरोजगार व उद्योग उभारणीसाठी सक्षम करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणादरम्यान उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, व्यवसाय नियोजन, विपणन, आर्थिक व्यवस्थापन तसेच व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विविध विषयांवर दहा दिवसात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी अमृत धुळे जिल्हा व्यवस्थापक श्री. हेमंत पाठक यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, "ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता उद्योजक बनण्याचा संकल्प करावा. अमृतच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांना कौशल्य, मार्गदर्शन आणि उद्योगासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारावा व इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात."

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 11:38 AM News publication time | Views: 14 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement