EDP प्रशिक्षण आणि वैयक्तिक व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून सोलापूरच्या नवउद्योजकाने साकारले आपले स्वप्न.
सोलापूर मध्ये 'अमृत'च्या पाठबळामुळे अरुण कुलकर्णी यांचा यशस्वी उद्योजकतेकडे प्रवास; नवी पेठेत CSC सेंटरचा यशस्वी विस्तार! EDP प्रशिक्षण आणि वैयक्तिक व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून सोलापूरच्या नवउद्योजकाने साकारले आपले स्वप्न. सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील अनेक तरुण आणि नवउद्योजक स्वावलंबी होत आहेत. याच उपक्रमाचा सकारात्मक परिणाम सोलापूरमध्ये पाहायला मिळत असून, श्री. अरुण कुलकर्णी यांनी 'अमृत' संस्थेच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचे (EDP) प्रशिक्षण आणि वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे 'Arun CSC Centre' (आपले सरकार सेवा केंद्र) यशस्वीपणे उभारले आहे. सोलापूरमधील नवी पेठ (६२६, साऊथ कसबा) येथे स्थित असलेले हे सीएससी सेंटर आज परिसरातील नागरिकांना विविध शासकीय व डिजिटल सेवा पुरवणारे एक प्रमुख केंद्र बनले आहे. केंद्राच्या माध्यमातून डिजिटल इंडिया, पॅन कार्ड, आधार सेवा आणि इतर नागरी सेवा जलद गतीने पुरवल्या जात असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. EDP प्रमाणपत्राचा व्यवसायात मोठा फायदा 'अमृत'तर्फे पूर्ण केलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या (EDP) प्रशिक्षणानंतर श्री. कुलकर्णी यांना प्रमाणपत्र (Certificate) प्रदान करण्यात आले होते. त्यांनी हे प्रमाणपत्र आपल्या केंद्रात सन्मानाने लावले असून, त्याचा व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मोठा फायदा झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. 'अमृत' संस्थेचे मानले आभार आपल्या या यशाचे श्रेय देताना श्री. अरुण कुलकर्णी यांनी 'अमृत' संस्थेच्या मार्गदर्शन व आर्थिक पाठबळाचे मनापासून कौतुक केले. "अमृत संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणामुळे व्यवसायाचे बारकावे समजले आणि व्याज परतावा योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळाले. यामुळेच आज मी माझा स्वतःचा व्यवसाय आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे चालवत आहे," अशा भावना व्यक्त करत त्यांनी 'अमृत' संस्थेचे विशेष आभार मानले. 'अमृत' संस्थेच्या अशा उपक्रमांमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुणांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असून, अरुण कुलकर्णी यांचे यश हे इतर नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment