जामखेड तालुका (अहिल्यानगर) - अथर्वसिंग शामसिंग परदेशी यास अमृत संस्थेमार्फत मिळाला फी परतावा

जामखेड तालुका येथील अथर्वसिंग शामसिंग परदेशी यास मिळाला अमृत संस्थे मार्फत शासकीय संगणक लघुलेखन व टँकलेखन कोर्स चा फी परतावा मिळाला आहे.

 जामखेड तालुका (अहिल्यानगर) - अथर्वसिंग शामसिंग परदेशी यास अमृत संस्थेमार्फत मिळाला फी परतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील अथर्वसिंग शामसिंग परदेशी यास अमृत संस्थेमार्फत शासकीय संगणक लघुलेखन व टंकलेखन इंग्रजी ३०/४० कोर्स केल्याबद्दल एकूण १३,००० रुपये फी परतावा मिळाला. आज अमृत मित्र वैभव कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेतली असता अथर्वसिंग परदेशी यांनी अमृत संस्थेचे आभार मानले. तसेच अमृत संस्थेमुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना लाभ घेता आला, याबद्दल समाधान व्यक्त केले. गौरव परदेशी यांना या फी परताव्याचा भविष्यातील वाटचालीसाठी खूप फायदा होणार आहे. अमृतच्या या आणि अशा अनेक लोकोपयोगी योजनांचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त पात्र तरुण उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अमृततर्फे करण्यात येत आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, सिंधी,कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 04:15 PM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 04:15 PM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement