मॅपिंग या विषयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे पुर्ण केले प्रशिक्षण .
गंगाखेड येथील बालाजी प्रकाश घवाड यांनी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत ड्रोन मिशन प्रशिक्षण योजनेअंतर्गत मॅपिंग या विषयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये मिशन प्लॅनिंग/टार्गेटिंग, डेटा कलेक्शन, फोटो कॅप्चर, फोटोग्रामेट्री, 2D ते 3D मॅप यासारखी कौशल्ये आत्मसात करता आली, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत अमृत संस्था व अमृत परभणी टीमचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी. येथे भेट द्यावी किंवा 7391065473 या क्रमांकावर संपर्क साधावा. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment