अकोल्यात 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण

अकोला येथील अमृत जिल्हा कार्यालयात अपराजित योद्धा- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

अकोल्यात 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण मुख्य फोटो
मुख्य फोटो

अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या पोस्टरचे आज अकोला येथील अमृत जिल्हा कार्यालयात अनावरण करण्यात आले. या प्रसंगी विविध सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महेश जोशी (सांस्कृतिक संवर्धन समिती, अकोला), डॉ. सुभाष देशपांडे (प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ) तसेच अविनाश तोडसाम (राष्ट्रीय कलामंच, विदर्भ प्रांत प्रमुख) यांच्या हस्ते 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी धनंजय कुलकर्णी (जिल्हा व्यवस्थापक, अमृत अकोला) यांनी 'पराक्रम दिन' उपक्रमाची माहिती देत श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे अद्वितीय शौर्य, कुशल नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. उपस्थित मान्यवरांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचा इतिहास युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजात राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि पराक्रमाची भावना दृढ करण्यासाठी 'पराक्रम दिन' महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी या ऐतिहासिक उपक्रमाला शुभेच्छा देत त्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 26-07-2026 News publication date | Time: 03:06 PM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 26-07-2026 News publication date | Time: 03:06 PM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

A
Adv.Dr.prakash joshi
28-07-2026 10:13 AM

आपणास खूप खूप शुभेच्छा..!आपला उपक्रम लवकरच यश प्राप्त करील यात शंका नाही.आपल्या कार्याला प्रणाम..!

Write a Comment
0 / 50 words
Advertisement