वर्षानुवर्षाचा हिशोब ठेवून वागल्यामुळे जगण्यातला आनंद मात्र जातो.

वर्षानुवर्षांचा हिशेब ठेवून जगल्यामुळे आयुष्यातील आनंद हरवतो. प्रेमाने, उदार मनाने आणि वर्तमानाचा आनंद घेत जगणे हेच खरे सुख आहे.

वर्षानुवर्षाचा हिशोब ठेवून वागल्यामुळे जगण्यातला आनंद मात्र जातो. मुख्य फोटो
मुख्य फोटो

एक कंजूस माणूस आपल्या पत्नीला घेऊन बागेत फिरायला जातो. तो दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. कारण त्यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस असतो. कामाच्या व्यापात पंचवीस वर्ष कशी निघून गेली हे कळलेही नाही पण आजचा दिवस लक्षात ठेवून बायको आग्रहाने नवऱ्याला बागेत फिरायला घेऊन जाते. बागेत बाकावर बसल्यावर नवरा तिला विचारतो, "आणखी एक आईस्क्रीम घ्यायचे का?" या प्रश्नाचे बायकोला आश्चर्य वाटते. ती विचारते, "आणखी म्हणजे काय ? अजून एकही आईस्क्रीम खाल्ले नाही तर तुम्ही आणखी एक घ्यायचे का असं कसं विचारता ?" त्यावर तो कंजूस नवरा उत्तर देतो, "म्हणजे? लग्न झालं तेव्हा एकदा आपण असेच बागेत फिरायला आलो होतो त्यावेळेस मी तुला आईस्क्रीम घेऊन दिले होते. आठवतं आहे ना!" त्याच्या या वाक्यावर त्याची बायको कपाळाला हात लावते. तात्पर्य - वर्षानुवर्षाचा हिशेब ठेवून वागल्यामुळे जगण्यातला आनंद मात्र जातो.

Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 04:31 PM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news
Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 04:31 PM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement