फोन खरोखर हॅक झाला आहे का? हे कसे ओळखाल?

सायबर सुरक्षा-लेख-क्र-८

फोन खरोखर हॅक झाला आहे का? हे कसे ओळखाल? मुख्य फोटो
मुख्य फोटो

सर्वप्रथम सांगतो की टेक्नोसॅव्ही लोकांना हे माहित असेलच पण मी शक्यतो ज्येष्ठ नागरिक, महिला जे टेक्नोसॅव्ही नसतात त्यांच्यासाठी अशा पोस्ट करतो. तर मंडळी, मोबाईल फोन हॅक झाला की सायबर फ्रॉड होतो आणि तुमचं आर्थिक, मानसिक व काही केसेसमध्ये ब्लॅकमेल सारखं संकट कोसळत. त्यामुळे "हॅक" या शब्दाचीच भीती अनेकांना बसलेली असते.

नुकताच एका मित्राचा फोन आलेला की, "डीडी, मला वाटतंय की माझा फोन कुणीतरी हॅक केलाय, तर मी काय करावं ?" यावर मी त्याला जे सांगून शांत केलं तेच तुम्हालाही सांगण्यासाठी आजची हि पोस्ट ! मान्य आहे की हॅकची भीती बसलीय पण त्यामुळे पॅनिक होऊ नका. घाबरून जाऊ नका. नाहीतर अजून जास्त चुका हातून होतात.

कारण फोनमध्ये अचानक घडणारी प्रत्येक विचित्र गोष्ट म्हणजे फोन हॅक झाला असे नसते.

खालीलपैकी अनेक लक्षणे एकाच वेळी दिसत असतील, तर मात्र हॅकिंगची शक्यता असते. त्यावेळी फोन तपासण्याची गरज आहे: आधी त्याची लक्षणे सांगतो, ✅ बॅटरी अचानक खूप लवकर संपणे (नेहमीपेक्षा जास्त)

✅ फोन विनाकारण गरम होणे

✅ इंटरनेट डेटा अनपेक्षितपणे जास्त वापरला जाणे

✅ आपण न केलेले कॉल, मेसेज किंवा WhatsApp संदेश दिसणे

✅ नवीन अँप्स आपोआप स्क्रीनवर दिसणे

✅ कॅमेरा किंवा मायक्रोफोन स्वतः सुरू झाल्यासारखे वाटणे

✅ बँक किंवा सोशल मीडिया खात्यात अनोळखी लॉगिनचे अलर्ट येणे

✅ फोन खूपच स्लो होणे किंवा वारंवार हँग होणे

महत्त्वाची गोष्ट म्हणजे

⚠️ यापैकी एकच लक्षण दिसले म्हणजे फोन हॅक झाला, असा निष्कर्ष काढू नका. अनेक वेळा ही समस्या जुना फोन, कमी स्टोरेज, खराब अँप किंवा सॉफ्टवेअर बगमुळेही होऊ शकते. म्हणून घाबरू नका, आधी पडताळणी करा... मगच निर्णय घ्या. "संशय आला म्हणून घाबरू नका... खात्री करूनच 'फोन हॅक झाला' असा निष्कर्ष काढा." फोन हॅक झाल्याचा संशय आल्यास त्वरित काय करावे?

✅ १. घाबरू नका. घाईघाईने कोणाच्याही सांगण्यावरून पैसे देऊ नका किंवा कोणतेही अँप इन्स्टॉल करू नका.

✅ २. इंटरनेट बंद करा. मोबाईल डेटा आणि Wi-Fi बंद करा. शक्य असल्यास Airplane Mode सुरू करा.

✅ ३. बँकेची सुरक्षितता तपासा. नेट बँकिंग, UPI आणि कार्ड व्यवहार लगेच तपासा. काही संशयास्पद दिसल्यास बँकेशी तात्काळ संपर्क साधा.

✅ ४. महत्त्वाचे पासवर्ड बदला. ई-मेल, बँक, WhatsApp, Facebook, Instagram यांचे पासवर्ड दुसऱ्या सुरक्षित डिव्हाइसवरून बदला.

✅ ५. अनोळखी अँप्स काढून टाका. आपण इन्स्टॉल न केलेले किंवा संशयास्पद अँप्स दिसत असतील तर ते अनइन्स्टॉल करा.

✅ ६. फोन अपडेट करा आणि अँटीव्हायरसने तपासणी करा. सिस्टम अपडेट आणि विश्वासार्ह सुरक्षा अँपने स्कॅन करा.

✅ ७. गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर संशय कायम असेल किंवा आर्थिक फसवणूक झाली असेल तर सायबर तज्ज्ञ किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.

लास्ट बट नॉट द लिस्ट : एक महत्त्वाची सूचना : फोन हॅक झाल्याचा संशय आला म्हणून लगेच Factory Reset करू नका. कारण त्यामुळे काही महत्त्वाचे पुरावे नष्ट होऊ शकतात. विशेषतः आर्थिक फसवणूक झाली असेल तर आधी आवश्यक पुरावे (स्क्रीनशॉट, व्यवहाराची माहिती, मेसेज) जतन करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. "तुमचा फोन हॅक झाला आहे, ₹5000 द्या, 10 मिनिटांत ठीक करून देतो" अशा नावाखाली सायबर भामटे तुमची दुसरी फसवणूक करतात. त्यामुळे "फोन हॅक झाला असला तरी घाबरून अनोळखी 'सायबर एक्स्पर्ट'कडे धाव घेऊ नका. आधी खात्री करा आणि विश्वासार्ह व्यक्ती किंवा अधिकृत यंत्रणेकडूनच मदत घ्या." हि माहिती नीट लक्षात ठेवा, सेव्ह करा आणि परिचितांनाही पाठवा !

शेवटी एकच सांगतो.... मोबाइलबद्दल काहीही घडो.... पॅनिक अजिबात व्हायचं नाही. तिथेच निम्मे धोके थांबतात.

- डॉ. धनंजय देशपांडे.(dd) National level awards ( 3 Times)

State level awards ( 3 Times)

HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

Mentor : Pune University, CANADA & UK

Guest Author for Amrut Maharashtra Portal (State Govt. Dept.)

सायबर सुरक्षा-लेख क्र. १ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सीबीआयच्या नावाखाली होतोय घाबरवणारा सायबर फ्रॉड-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2007

सायबर सुरक्षा-लेख क्र. २ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सायबर क्राईमच्या राजधानीवर छापा- पकड्लेल्यामध्ये शेकडो भारतीय तरुणगुन्हेगारी विश्वात खळबळ-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2123

सायबर सुरक्षा-लेख क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

कारमध्ये dashcam हवाच !- तो खर्च वाढवत नाही तर वाचवतो

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2258

सायबर सुरक्षा-लेख-क्र-४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

तुमची फोटो गॅलरी म्हणजे खाजगी डायरी- ती भामट्यांच्या हातात पडण्यापासून जपा!

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2403

सायबर सुरक्षा-लेख-क्र-५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

ना ओटीपी दिला ना लिंक क्लिक केली तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2565

सायबर सुरक्षा-लेख-क्र-६ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

ताणतणावातून येणारा हार्टअटॅक टाळायचाय?..मग ३ मिनिट वेळ काढून वाचा!

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2730

सायबर सुरक्षा-लेख-क्र-७ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

मोबाईलमधील फोटो डिलीट झालेत? फोटो परत मिळू शकतात, पॅनिक होऊ नका !

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2864

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-08-2026 News publication date | Time: 01:34 PM News publication time | Views: 94 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-08-2026 News publication date | Time: 01:34 PM News publication time | Views: 94 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement