"ड्रोन प्रशिक्षणाने मिळाले नवीन कौशल्य — जालना येथील सचिन सूर्यकांत मोताळे यांचा अनुभव

जालना येथील रहिवासी सचिन सूर्यकांत मोताळे यांनी अमृत ड्रोन प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. जाणून घेऊया त्यांच्या अनुभवाविषयी-

"ड्रोन प्रशिक्षणाने मिळाले नवीन कौशल्य  — जालना येथील सचिन सूर्यकांत मोताळे यांचा अनुभव  मुख्य फोटो
"ड्रोन प्रशिक्षणाने मिळाले नवीन कौशल्य  — जालना येथील सचिन सूर्यकांत मोताळे यांचा अनुभव  अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या ड्रोन मिशन प्रशिक्षण योजनेअंतर्गत जालना रहिवासी सचिन मोताळे यांनी सर्वे अँड मॅपिंग या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून त्यांनी मिळालेल्या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आणि कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाच्या उपक्रमांचा लाभ न मिळणाऱ्या जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा तिचा लक्षित गट आहे.


प्रशिक्षणादरम्यान अनुभवी मार्गदर्शकांकडून ड्रोनचे तांत्रिक ज्ञान, सुरक्षित उड्डाण (Safe Flying), सर्वे मॅपिंग तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. आधुनिक ड्रोन उपकरणांचा उपयोग, क्षेत्रीय डेटा गोळा करणे आणि तो प्रक्रिया करून मॅपिंग करणे यावरही व्यावहारिक मार्गदर्शन करण्यात आले, असे मोताळे यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की या प्रशिक्षणामुळे त्यांच्या रोजगारसंधी कौशल्यात लक्षणीय वाढ झाली आहे आणि स्थानिक पातळीवर ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा आत्मविश्वास मिळाला. प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना ड्रोन ऑपरेट करण्याचा परवाना देखील मिळाला आहे.


अमृत संस्थेचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे हे असून, या कार्यक्रमाद्वारे ड्रोन-आधारित सर्वेक्षण व मॅपिंग क्षेत्रातील कौशल्ये स्थानिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सतत सुरू आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 20-07-2026 News publication date | Time: 12:56 PM News publication time | Views: 232 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 20-07-2026 News publication date | Time: 12:56 PM News publication time | Views: 232 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement