साक्षी रणनवरे यांनी शासकीय ऑनलाइन शॉर्टहँड (लघुलेखन) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर अमृत संस्थेच्या परीक्षा शुल्क परतावा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला. अर्जाची आवश्यक पडताळणी व तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना दोन विषयांच्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळाला.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्क परतावा योजनेचा लाभ जालना येथील लाभार्थी साक्षी रणनवरे यांना मिळाला असून, त्यांनी व त्यांचे पालक श्री. मिलिंद रणनवरे यांनी या लाभाबद्दल समाधान व्यक्त करत अमृत संस्थेचे आभार मानले. साक्षी रणनवरे यांनी शासकीय ऑनलाइन शॉर्टहँड (लघुलेखन) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर अमृत संस्थेच्या परीक्षा शुल्क परतावा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला. अर्जाची आवश्यक पडताळणी व तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना दोन विषयांच्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळाला. लाभ प्राप्त झाल्यानंतर जालना येथील लाभार्थी साक्षी रणनवरे व त्यांचे पालक श्री. मिलिंद रणनवरे यांनी अमृत जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी या योजनेमुळे झालेल्या आर्थिक दिलासाबद्दल समाधान व्यक्त करून अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. याप्रसंगी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी साक्षी रणनवरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अमृत संस्थेच्या विविध शैक्षणिक, कौशल्य विकास व रोजगाराभिमुख योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. यावेळी साक्षी रणनवरे यांनी सांगितले की, अमृत संस्थेमुळे परीक्षा शुल्काचा आर्थिक भार कमी झाला असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन मिळते. पालक श्री. मिलिंद रणनवरे यांनीही ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी जालना येथील लाभार्थी साक्षी रणनवरे व त्यांचे पालक श्री. मिलिंद रणनवरे यांनी अमृतच्या लक्षित घटकातील सर्व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परीक्षा शुल्क परतावा तसेच संस्थेच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment