सुवर्णसंधी! अमृत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

महाराष्ट्र शासनाच्या अमृत (AMRUT) संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी!
​आपल्या स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न आता होणार साकार. अमृत संस्थेकडून मिळवा तुमच्या व्यावसायिक कर्जावरील व्याजाचा परतावा!

सुवर्णसंधी! अमृत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मुख्य फोटो
मुख्य फोटो

सुवर्णसंधी! अमृत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (AMRUT)

महाराष्ट्र शासनाच्या अमृत (AMRUT) संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी!

आपल्या स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न आता होणार साकार. अमृत संस्थेकडून मिळवा तुमच्या व्यावसायिक कर्जावरील व्याजाचा परतावा!

योजनेची ठळक वैशिष्ट्ये व फायदे

कमाल कर्ज मर्यादा: व्यवसाय किंवा उद्योगासाठी कोणत्याही अधिकृत बँकेकडून घेतलेल्या रु. १५ लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा. व्याज परतावा दर: वेळेवर हप्ते भरल्यास कर्जावरील व्याज (कमाल द.सा.द.शे. १२%** च्या मर्यादेत) दर *३ महिन्यांनी थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात (DBT द्वारे) जमा. कालावधी: व्याज परतावा कमाल २ वर्षे पात्रता व अटी प्रवर्ग: केवळ खुल्या प्रवर्गातील (General Category) उमेदवार. आर्थिक स्थिती: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) कुटुंबातील असावा. रहिवासी: अर्जदार "महाराष्ट्राचा रहिवासी"असावा. वय मर्यादा: १८ ते ६० वर्षे प्राधान्य: अमृत संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात किंवा कृषी उत्पन्न आधारित उद्योग प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना निवडीत प्रथम प्राधान्य. पात्र जाती (Target Castes) खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जाती: (सिंधी, मारवाडी, राजपुरोहित, ब्राह्मण, काम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेन्गुंथर, भूमिहार, गुजराती, जाट, बनिया, कोमटी, नेपाळी हिंदू, लोहाना इत्यादी.) आवश्यक कागदपत्रे व नियम 1. आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य) 2. व्यवसायाचे PAN कार्ड (स्व-साक्षांकित प्रत) 3. डोमिसाईल प्रमाणपत्र (तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे) 4. चालू वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे) 5. बँक सॅन्क्शन लेटर (Bank Sanction Letter) 6. बँक लोन स्टेटमेंट (Bank Loan Statement) 7. बचत खाते तपशील किंवा कॅन्सल चेक (Savings Account / Cancelled Cheque) 8. शाळा सोडल्याचा दाखला / प्रवेश निर्गम (G.R. Extract)/ गॅझेट. 9. अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार (Defaulter) नसावा. 10. कर्ज हे RBI मान्यताप्राप्त राष्ट्रीयीकृत, सहकारी, जिल्हा मध्यवर्ती किंवा खाजगी बँकेकडून घेतलेले असावे.

अर्ज करण्याची सोपी पद्धत

1. ऑनलाईन नोंदणी: सर्वप्रथम www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरा. 2. कागदपत्रे अपलोड करा: सर्व मूळ कागदपत्रे संकेतस्थळावर योग्य स्वरूपात अपलोड करा. 3. हार्डकॉपी सबमिट करा: ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून, त्यावर स्वतःची स्वाक्षरी करावी आणि सर्व जोडलेली कागदपत्रे स्व-साक्षांकित (Self-attested) करून ती अमृत कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे सादर करणे बंधनकारक आहे. संपर्क व अधिक माहितीसाठी: अमृत कर्ज व्याज परतावा योजनेचे रजिस्ट्रेशन सध्सया सुरू आहे. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क साधा: अमृत जिल्हा कार्यालय, नांदेड- मोबाईल: ७३९१०६५४७२ (7391065472)


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 10:37 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 10:37 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement